CDCC Bank Election : चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे दोन दिग्गज; नामनिर्देश केले दाखल

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा बँक निवणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली. कार्यक्रमानुसार १० जुलैला ९५० मतदार २१ संचालक निवडणार आहेत
CDCC Bank Election
CDCC Bank ElectionSaam tv
Published On

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तब्बल १३ वर्षानंतर जिल्हा बँकेची निवडणूक होत असल्याने या निवडणुकीचे मोठे महत्व आहे. यातच या निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसचे दोन दिग्गज नेते उतरले आहेत. या दोघांनीही आपले नामनिर्देश दाखल केले असून माघारीनंतर याचे चित्र स्पष्ट होणार आहे. 

चंद्रपूर जिल्हा बँक निवणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी अनेकांनी तयारी सुरु केली आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार १० जुलैला ९५० मतदार २१ संचालक निवडणार आहेत. यासाठी ११ जूनपर्यंत नामानिर्देशन पत्र दाखल करण्याची अंतिम तारीख असून आतापर्यंत ६१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या निवडणुकीच्या मैदानात काँग्रेसचे दोन दिग्गज नेते उतरले आहेत. 

CDCC Bank Election
Jalna : शेतातील तुटलेल्या वायरने घात केला, बापाला वाचवायला गेले पण स्वत: जीव गमावून बसले; जालन्यात वडिलांसह दोन मुलांचा अंत

संचालक पदासाठी अर्ज दाखल  

दरम्यान काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बँकेच्या संचालक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही नेत्यांच्यावतीने आज जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला. विजय वडेट्टीवार यांनी सिंदेवाही तालुक्यातून "अ" गटासाठी उमेदवारी दाखल केली  तर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी ओबीसी आणि "ब" गटाच्या एका जागेसाठी अशा दोन ठिकाणाहून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

CDCC Bank Election
Yawal News : नाल्यात पडलेल्या बकरीला वाचविताना झाला घात; तरुणाचा गाळात बुडून मृत्यू

निवडणुकीत चुरस वाढणार 

प्रदीर्घ कालावधीनंतर होणाऱ्या या निवडणुसाठी मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. त्यातच आता धानोरकर आणि वडेट्टीवार यांनी थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने निवडणुकीत चुरस बघायला मिळणार आहे. बँकेच्या विद्यमान कार्यकाळात बंपर नोकर भरती निघाली. यामुळेच जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये या बँकेवर प्रभुत्व मिळविण्याची स्पर्धा बघायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com