Jalna News
Jalna NewsSaam tv

Jalna : शेतातील तुटलेल्या वायरने घात केला, बापाला वाचवायला गेले पण स्वत: जीव गमावून बसले; जालन्यात वडिलांसह दोन मुलांचा अंत

Jalna News : वरुड शिवारातील शेतातमध्ये विनोद म्हस्के हे शेतात काम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असतानाच शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारे केबल कट झाल्याने म्हस्के यांना विजेचा धक्का बसला
Published on

अक्षय शिंदे 

जालना : शेतात काम करत असताना दुर्दैवी घटना घडली आहे. शेतात काम करताना शेतातून गेलेल्या तुटलेल्या वायरला स्पर्श झाला. यात जोरदार झटका बसल्याने वडील जमिनीवर कोसळले. त्यांच्याजवळ गेलेल्या दोन्ही मुलांना देखील जोरदार झटका बसून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जालन्यात घडली आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

जालना जिल्हातील वरुड गावामध्ये हि दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत विनोद तुकाराम मस्के यांच्यासह श्रद्धा म्हस्के आणि समर्थ मस्के या दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. दरम्यान वरुड शिवारातील शेतातमध्ये विनोद म्हस्के हे शेतात काम करत होते. शेतामध्ये मल्चिंग पेपर अंथरत असतानाच शेतातून विद्युत प्रवाह घेऊन जाणारे केबल कट झाल्याने विनोद म्हस्के यांना विजेचा धक्का बसला. यात ते जमिनीवर कोसळले. 

Jalna News
Nagpur : पप्पा..पप्पा..म्हणत चिमुकलीने हंबरडा फोडला; याचना कोणापर्यंत पोहचलीच नाही, डोळ्यादेखत पित्याचे छत्र हरपले

जमिनीवर पडलेल्या वडिलांना पाहून मुले धावत गेली 

तर त्यांच्या सोबत असलेले श्रद्धा आणि समर्थ हि दोन्ही मुले वडील जमिनीवर का पडले हे पाहण्यासाठी गेले. वडिलांना आवाज देत उठवण्यासाठी स्पर्श करताच मस्के यांच्या अंगात विद्युत प्रवाह असल्याने या दोन चिमुकल्यांनाही विजेचा धक्का बसला. यात मुलांचा देखील जागीच मृत्यू झाला. ही घटना विनोद मस्के यांच्या पत्नीने पाहिल्यानंतर त्यांनी आरडाओरोड केली. आवाज ऐकून आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली विद्युत प्रवाह खंडित केला.  

Jalna News
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा सुरू होताच आत्तापर्यंत चार अपघात

वरुड गावासह परिसरात शोककळा

त्यानंतर विनोद मस्के यांच्या श्रद्धा आणि सार्थक या तिघांना जालन्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर या तिघांना मृत घोषित केले. दरम्यान वटपौर्णिमेच्या दिवशीच घटना घडल्याने गावासह परिसरात हळहळ व्यक्त केले जात आहे. या घटनेमुळे वरुड गावासह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com