Accident News: भाविकांवर काळाचा घाला; देवदर्शनाला जाणाऱ्यांची कार तलावात बुडाली, ११ जणांचा मृत्यू

Tragic Accident In Uttar Pradesh : उत्तर प्रदेशातील गोंडा येथे एक मोठा अपघात झालाय. कार कालव्यात पडल्याने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.
Accident News: भाविकांवर काळाचा घाला; देवदर्शनाला जाणाऱ्यांची कार तलावात बुडाली, ११ जणांचा मृत्यू
Published On

उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात मोठा अपघात झालाय. एका तलावात बोलेरो कार बुडाली असून यात ११ जणांचा मृत्यू झालाय. हा अपघात इटियाथोक तालुक्यातील रेहरा गावात घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरो कारमधील सर्व भाविक हे सीहगावाचे रहिवाशी असून ते एकाच कुटुंबातील सदस्य होते. ते सर्वजण पृथ्वीनात मंदिर दर्शनसाठी जात होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची माहिती घेतली असून त्यांनी तात्काळ मदत पुरवण्याचे आणि उपचार देण्याचे आदेश बचाव दलास दिलेत.

कार कालव्यात बुडून ११ जणांचा मृत्यू झालाय. घटनेची माहिती मिळताच सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत. मुख्यमंत्री योगी यांनी घटनेची दखल घेतली आहे आणि जखमींवर त्वरित योग्य उपचार करण्याचे आदेश दिलेत. ही दुर्घटना इटियाथोक तालुक्यातील बेलवा परिसरात घडलीय. गावाजवळील तलावात बोलेरो कार बुडालीय. सीहागाव येथील प्रल्हाद गुप्ता यांचे कुटुंब बोलेरो कारतून पृथ्वीनाथ मंदिरला दर्शन घेण्यासाठी जात होते. त्यावेळी देवरिया मार्गावरील रेहरा गावाजवळील तलावात कार बुडाली यात ११ जणांचा मृत्यू झाला.

अपघात घडल्यानंतर स्थानिक मदतीला धावले. त्यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती देत त्यांना पाचारण केलं. हाती आलेल्या माहितीनुसार, तलावातून ११ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. तर ४ जणांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये मुले, महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाशी संबंधित लोक घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले.

मुख्यमंत्री योगींनी या घटनेची दखल घेतलीय. शोकग्रस्त कुटुंबांना संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिलेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करा असेही निर्देश दिलेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा त्यांनी सोशल मीडिया पोस्ट द्वारे केलीय. गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे.

या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे आणि जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश दिले आहेत, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

मुख्यमंत्री योगींनी या घटनेची दखल घेतलीय. शोकग्रस्त कुटुंबांना संवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून मदतकार्य जलदगतीने करण्याचे निर्देश दिलेत. तसेच जखमींवर योग्य उपचार करा असेही निर्देश दिलेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याची घोषणा करताना सोशल मीडियावर लिहिले की, गोंडा जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातात जीवितहानी अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com