Nadurbar Accident  Saam Tv
महाराष्ट्र

Nandurbar: नंदुरबारमध्ये यात्रेदरम्यान मोठी दुर्घटना, पाळण्याची कडी तुटल्याने १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Nadurbar Accident: नंदुरबारमध्ये जत्रोत्सवात मोठी दुर्घटना घडली. पाळण्याची कडी तुटली आणि १९ वर्षांचा तरुणी उंचावरून खाली पडला. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Priya More

Summary:

  • नंदुरबारच्या धडगाव यात्रोत्सवात मोठी दुर्घटना घडली

  • पाळण्याची कडी तुटल्याने १९ वर्षीय तरुण उंचावरून खाली पडला

  • या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झाला

  • उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले

सागर निकवाडे, नंदुरबार

नंदुरबारमध्ये यात्रोत्सवात मोठी दुर्घटना घडली. पाळण्याची कडी तुटल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. नंदूरबारच्या धडगाव शहरातील जुने धडगाव परिसरात सुरू असलेल्या महादेव आणि देवमोगरा माता मंदिर यात्रोत्सवात आज ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली. यात्रेतील पाळण्याची कडी अचानक तुटल्याने १९ वर्षीय तरुण खाली कोसळला. या थरारक अपघातामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धडगाव येथे महाशिवरात्रीनिमित्त यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. यात्रोत्सवादरम्यान पाळण्यामध्ये १९ वर्षीय तरुण बसला होता. यावेळी पाळण्याची कडी अचानक तुटली आणि तरुण उंचावरून खाली पडला. या अपघातामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.

मृत तरुण धडगाव तालुक्यातील छापरी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. यात्रोत्सवादरम्यान तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. महत्वाचे म्हणजे या गंभीर घटनेसंदर्भात धडगाव पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या घटनेमुळे नंदुरबारमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bread Upma Recipe : नाश्त्याला काही हलके-फुलके खावंसं वाटतंय? मग झटपट बनवा ब्रेड उपमा

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील भोगावती साखर कारखान्यावर जोरदार हाणामारी

अजितदादांच्या विमानाचा ब्लॅकबॉक्स जळाला, पुरावा नष्ट? अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर

Ajit Pawar Plane Crash Case: पायलट कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले, कधी निघाले? त्याचा CCTV पुरावा द्या; मिटकरींची मागणी

Grey Saree Contrast Blouse: ग्रे रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

SCROLL FOR NEXT