रस्त्यावर खेळताना विपरीत घडलं, शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू; संतप्त नातेवाईकांनी हायवे अडवला

beed news : बीडमध्ये रस्त्यावर खेळताना शॉक लागून १५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी हायवे अडवल्याचं पाहायला मिळालं.
Beed news :
beed news Saam tv
Published On
Summary

उघड्या विद्युत रोहित्राला चिकटून पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

संतप्त नातेवाईकांचा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या

पोलिस आंदोलकांवर करणार गुन्हे दाखल

योगेश काशिद, साम टीव्ही

बीड शहरातील गोरे वस्ती भागात उघड्या असलेल्या विद्युत रोहित्राला चिकटून एका पंधरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेख अवेज शेख परवेज असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव असून गोरे वस्ती परिसरात खेळत असताना ही घटना घडली. दरम्यान संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले आहे. जिल्हा रुग्णालय परिसरात मोठा जमाव आहे. शहरातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या देत नातेवाईकांकडून आंदोलन केले जात आहे.

Beed news :
भारताच्या वादळात पाकिस्तान उडाला; गोलंदाजीपुढे अख्खा संघ धडाधड गडगडला, टी२० विश्वचषकाच्या सामन्यात टीम इंडियाची विजयी गर्जना

बीड शहरातील विस्तारित भाग असलेला गोरे वस्ती या ठिकाणी विद्युत डेपोला चिटकून एका पंधरा वर्षे मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. 15 तास उलटून गेले तरीही विद्युत विभागाने याची कसलीही दखल घेतली नाही, असा नातेवाईकांचा आरोप आहे.

बीड शहरात अनेक ठिकाणी विद्युत डिपी उघड्या आहेत. त्यामुळे विद्युत विभागाने लवकरात लवकर बीड शहरातील या डिपी बंद कराव्यात. तसेच पीडित कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी, आम्ही जिल्हा रुग्णालयाच्या बाजूलाच मुख्य रस्त्यावर रस्ता रोको केला आहे, असे नातेवाईकांनी सांगितले.

Beed news :
Punjab CM : मुख्यमंत्र्यांची तब्येत बिघडली; फोर्टिस रुग्णालयात दाखल

बीड जिल्हा हा अगोदरच सेन्सिटिव्ह जिल्हा म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी बीड शहरातील आणि हद्दवाढ बागेत भागातील ज्या डीपी आहेत. त्याचे दरवाजे बंद करावे जेणेकरून अशा घटना होणार नाहीत. विद्युत विभागाच्या वतीने यासंदर्भात कुठलीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे अशा घटनांना नागरिकांना सामोरे जावे लागते. तात्काळ या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू, अशा इशारा देखील नातेवाईकांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com