Maharashtra Winter News Saam Tv
महाराष्ट्र

Today Weather News : महाराष्ट्रात हुडहुडी! तापमान १० अंशाखाली घसरलं, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी; वाचा IMDचा अंदाज

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला असून धुळे येथे हंगामातील नीचांकी ५.४°C तापमान नोंदले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेक जिल्ह्यांत तापमान १० अंशांखाली आहे.

Alisha Khedekar

  • राज्यात थंडीची तीव्र लाट, तापमानात मोठी घसरण

  • धुळ्यात हंगामातील नीचांकी ५.४°C तापमान

  • मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यास यलो अलर्ट जारी

  • अनेक जिल्ह्यांत १० अंशांखाली तापमान, गारठा वाढला

उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे वेगाने येत असल्याने राज्यात गारठा वाढला आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात हंगामातील नीचांकी ५.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या कडाका असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट दिला असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. सतत बदलणारे वातवरण नागरिकांसाठी तापदायक ठरत आहे.

काल म्हणजेच मंगळवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्याचे यंदाच्या हंगामातील नीचांकी ५.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड आणि परभणी मधील तापमान ५.९ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जेऊर येथे ६ अंश तापमानाची नोंद झाली. तर अहिल्यानगर, पुणे, जळगाव, ‎गोंदिया, नागपूर, भंडारा येथे ९ अंशांपेक्षा कमी, तर मालेगाव, यवतमाळ, नाशिक येथे १० अंशांपेक्षा तापमान नोंदले गेल्याने हुडहुडी वाढली आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. मंगळवारी धुळे, निफाड, परभणी, जेऊर, गोंदिया, यवतमाळ येथे थंडीची लाट होती. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड येथे थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.

'या' जिल्ह्यांमध्ये असं असेल तापमान

  1. अहिल्यानगर: ७.४ अंश सेल्सिअस

  2. नाशिक: ९.३ अंश सेल्सिअस

  3. यवतमाळ: ९.२ अंश सेल्सिअस

  4. जळगाव: ८.४ अंश सेल्सिअस

  5. मालेगाव: ९.२ अंश सेल्सिअस

  6. गोंदिया: ८.६ अंश सेल्सिअस

  7. पुणे: ८.९ अंश सेल्सिअस

  8. नागपूर: ८.८ अंश सेल्सिअस

  9. अमरावती: १०.६ अंश सेल्सिअस

  10. महाबळेश्वर: १२ अंश सेल्सिअस

  11. सातारा: ११.२ अंश सेल्सिअस

  12. सांगली: १३.२ अंश सेल्सिअस

  13. सोलापूर: १३.४ अंश सेल्सिअस

  14. छत्रपती संभाजीनगर: ११ अंश सेल्सिअस

  15. परभणी: ११ अंश सेल्सिअस

  16. अकोला: १०.६ अंश सेल्सिअस

  17. धुळे : ५.४ अंश सेल्सिअस

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ऐकावं ते नवलच! चक्क कांदा-लसणामुळे घटस्फोट, तब्बल २३ वर्षांचा संसार मोडला

Alibag Leopard : अलिबागमध्ये बिबट्याची दहशत! ५ जणांवर दिवसाढवळ्या हल्ला, शाळा बंद ठेवण्याचा निर्णय

Kitchen Hacks : किचनमधील स्टिलची भांडी काळवंडली आहेत ? मग करा हे स्वस्तात मस्त उपाय

Maharashtra Live News Update: सावंतवाडीत महसूल विभागाची मोठी कारवाई, अवैध वाळू वाहतूक करणारे ६ डंपर जप्त

Pune Travel : ट्रेकिंगचा थरार अनुभवायचाय? वीकेंडला पुण्यातील ‘या’ किल्ला भेट द्या

SCROLL FOR NEXT