Leopard Attack : आधी पायाला चावा नंतर मानेवर हल्ला, महिला घराबाहेर पडताच बिबट्याने संधी साधली

Pune Leopard Attack : पुणे जिल्ह्यातील अष्टापूर परिसरात पहाटे पन्नास वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला केला. प्रसंगावधान राखून महिलेनं जीव वाचवला आहे.
Leopard Attack : आधी पायाला चावा नंतर मानेवर हल्ला, महिला घराबाहेर पडताच बिबट्याने संधी साधली
Pune Leopard Attack NewsSaam Tv
Published On
Summary
  • पहाटे अष्टापूरमध्ये महिलेवर बिबट्याचा हल्ला

  • आरडा-ओरड करत महिलेनं प्रसंगावधानानं जीव वाचवला

  • जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं

  • बिबट्याच्या हालचाली वाढल्याने परिसरात भीतीचं वातावरण

सागर आव्हाड, पुणे

पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर परिसरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे. पन्नास वर्षीय महिलेवर बिबट्याने थेट हल्ला केला. सुदैवाने महिलेनं प्रसंगावधान राखत आरडा-ओरड करत जीव वाचवला. महिलेला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. जखमी महिलेचं नाव अंजना कोतवाल असे आहे.

अष्टापूर येथील अंजना वाल्मीक कोतवाल या आज पहाटे दशक्रिया विधीसाठी घराबाहेर पडल्या. तेव्हाच अंधाराचा फायदा घेत दबा धरून बसलेल्या बिबट्यानं त्यांच्या पायावर प्रथम हल्ला चढवला. सुरुवातीला हा कुत्र्याचा हल्ला असल्याचं त्यांना वाटलं. पण त्या दगड उचलण्यासाठी खाली वाकल्या, तेवढ्यात बिबट्यानं थेट त्यांच्या डोक्यावर झेप घेतली.

Leopard Attack : आधी पायाला चावा नंतर मानेवर हल्ला, महिला घराबाहेर पडताच बिबट्याने संधी साधली
Breaking News : नातं कायमच तुटलं! स्मृतीने पलाशला सोशल मीडियावरूनही केलं अनफॉलो

अचानक झालेल्या हल्ल्यानंतर त्या गोंधळल्या. त्यांनी जोरदार आरडा-ओरडा करत मदतीसाठी हाका मारल्या. त्यांच्या ओरडण्याने बिबट्या घाबरला आणि पळून गेला. पहाटे पहाटे अंजना यांच्या ओरडण्याने नागरिकांनी आणि कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा आवाज ऐकून सगळे जागे झाले. घटनास्थळी आलेल्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना बिबट्या पळताना दिसला. जखमी झालेल्या अंजना यांना तातडीने कुटुंबीयांनी वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आलं.

Leopard Attack : आधी पायाला चावा नंतर मानेवर हल्ला, महिला घराबाहेर पडताच बिबट्याने संधी साधली
Today Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा थंडीची लाट! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा येलो अलर्ट; जाणून घ्या सविस्तर

सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून या परिसरात बिबट्याच्या हालचाली वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागानं घटनास्थळी भेट देऊन शोधमोहीम सुरू केली आहे.अष्टापूरमध्ये झालेल्या या हल्ल्यानंतर प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांना पहाटे आणि रात्री बाहेर पडताना विशेष काळजी घेण्याचं आवाहन वनविभागानं केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com