Maharashtra Weather Update Saam tv
महाराष्ट्र

Today Weather : राज्यात पुढील काही दिवस थंडी कायम! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, जाणून घ्या IMDचा इशारा

Maharashtra Weather Update News : महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वारे आल्याने किमान तापमानात मोठी घसरण झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता व्यक्त करून हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी कायम राहणार आहे.

Alisha Khedekar

  • उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रात तापमानात मोठी घट

  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट; यलो अलर्ट जारी

  • परभणी, धुळे, जेऊर येथे सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

  • पुढील काही दिवस राज्यात कडाक्याची थंडी कायम राहणार

उत्तरेकडील शीत वारे महाराष्ट्राकडे येत असल्याने राज्यात थंडीची लाट दोन दिवस कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात थंडीच्या लाटेची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. उर्वरित राज्यात हुडहुडी कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे. मुंबई, पुण्यात देखील नागरिक थंडीने कुडकुडले आहेत.

राज्यात बुधवारी परभणी येथे नीचांकी ५.७ अंश सेल्सिअस, तर धुळे आणि जेऊर येथे प्रत्येकी ६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड मध्ये ६.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. अहिल्यानगर, जळगाव येथे ८ अंशांपेक्षा कमी, तर नाशिक, पुणे, ‎यवतमाळ, ‎नागपूर, ‎गोंदिया येथे ९ अंशांपेक्षा कमी आणि मालेगाव, ‎वर्धा येथे १० अंशांपेक्षा तापमान नोंदले गेल्याने हुडहुडी कायम आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास तसेच तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची घट झाल्यास थंडीचा लाट, तर तापमानात ६.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास तीव्र लाट आल्याचे समजले जाते. काल धुळे, निफाड, नाशिक, जेऊर, परभणी, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर येथे थंडीची लाट होती. आज मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि विदर्भातील गोंदिया जिल्ह्यांत थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे.दरम्यान पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे.

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान ?

  • अहिल्यानगर: ७.५ अंश सेल्सिअस तापमान

  • नाशिक: ८.१ अंश सेल्सिअस तापमान

  • जळगाव: ८.० अंश सेल्सिअस तापमान

  • मालेगाव: ९.४ अंश सेल्सिअस तापमान

  • यवतमाळ: ८.८ अंश सेल्सिअस तापमान

  • अकोला: १०.८ अंश सेल्सिअस तापमान

  • गोंदिया: ८.४ अंश सेल्सिअस तापमान

  • नागपूर: ८.० अंश सेल्सिअस तापमान

  • अमरावती: ११.९ अंश सेल्सिअस तापमान

  • वर्धा: ९.५ अंश सेल्सिअस तापमान

  • पुणे: ८.४ अंश सेल्सिअस तापमान

  • महाबळेश्वर: ११.६ अंश सेल्सिअस तापमान

  • सातारा: ११.६ अंश सेल्सिअस तापमान

  • सांगली: १३ अंश सेल्सिअस तापमान

  • सोलापूर: १३.२ अंश सेल्सिअस तापमान

  • छत्रपती संभाजीनगर: १०.८ अंश सेल्सिअस तापमान

  • परभणी: १०.५ अंश सेल्सिअस तापमान

  • बीड: ९.० अंश सेल्सिअस तापमान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: नवनाथ वाघमारे यांच्यावर गुन्हा दाखल करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT