three passed away in wardha heat stroke  Saam Digital
महाराष्ट्र

Wardha : उष्माघाताचा धाेका! वर्धेत तिघांचा मृत्यू

Siddharth Latkar

- चेतन व्यास

वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. गेल्या तीन दिवसांपासून तापमान 45 अंशाच्या घरात आहे. मंगळवारी तापमान 45.2 अंश इतके होते. वाढत्या तापमानाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. वर्धा जिल्ह्यात बेशुद्धावस्थेत तिघांचा मृतदेह आढळला आहे. या तिघांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर तिघांच्या मृत्यूचे नेमके कारण समाेर येईलच परंतु नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे बनले आहे.

वर्धा येथील स्टेशन फैल परिसरात मिलिंद रामदास सालोडकर (४५ रा. पळसगाव ता. देवळी) याचा मृतदेह आढळला. मिलिंदला दारू पिण्याचे व्यसन होते असे सांगितले जात आहे. तो नेहमीच दारु पिऊन पडल्याने जखमी व्हायचा.

मिलिंद हा मद्यधुंद अवस्थेत स्टेशनफैल परिसरात असलेल्या बुद्धविहाराच्यासमोर पडून होता. दिवसभर दारूच्या नशेत पडून असल्याने त्याला पाणी मिळाले नाही. त्यामुळे उष्माघाताने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज शहर पोलिसांनी वर्तविला आहे. मिलिंद याचा आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना आर्वी शहरात घडली. आंबेडकरनगर येथील रहिवासी देवराव तुकाराम मेश्राम (७०) हे टिनाच्या झोपडीत राहायचे. ते मृतावस्थेत राहत्या घरी आढळले. उष्माघातामुळे त्यांना चक्कर येऊन ते जमिनीवर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची नोंद आर्वी पोलिसांनी घेतली आहे.

तिसरी घटना वडनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ६० वर्षीय वृद्ध निंबाच्या झाडाखाली निपचीत पडून असल्याचे दिसले. त्यांचा मृत्यू उष्पाघाताने झाल्याचा अंदाज वर्तविला असून याबाबतची नोंदही पोलिसांनी घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramraje Naik Nimbalkar: रामराजे तुतारी फुंकणार? आधी भाजप आता दादांची कोंडी? शरद पवारांचे महायुतीला धक्क्यांवर धक्के

Fact Check : तुमच्या कॉफीत शेणाची भेसळ? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? पाहा व्हिडिओ

Cancer Detection Test : आता 1 मिनिटात कॅन्सरचं निदान होणार; IIT कानपूरनं बनवलं कॅन्सर डिव्हाईस, पाहा व्हिडिओ

Maharashtra Politics : विधानसभेला एकनाथ शिंदेंची कसोटी; यंदा मुख्यमंत्र्यांसमोर आव्हान काय? पाहा व्हिडिओ

Ajit Pawar on Sharad Pawar: 'सून म्हातारी झाली', अजित पवार यांचा नाव न घेता शरद पवारांना टोला; पुन्हा काढलं वय, VIDEO

SCROLL FOR NEXT