theft case in bank of maharashtra tembharda branch saam tv
महाराष्ट्र

कुत्र्यांनी राेखला Bank Of Maharashtra चा दराेडा, घटनेची गावात माेठी चर्चा

ही बँक तब्बल ७ वेळा फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात घटनेची मोठी चर्चा आहे.

संजय तुमराम

Chandrapur News :

कुत्र्यांचा भुंकण्यामुळे सतर्क झालेल्या ग्रामस्थांमुळे बँक ऑफ महाराष्ट्रची (bank of maharashtra) चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा गावातील शाखा फोडण्याचा चाेरट्यांचा प्रयत्न फसला. वरोरा पोलीस अधिक तपास करत आहेत. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातल्या टेमुर्डा गावातील बँकेचे शाखा नागपूर-चंद्रपूर महामार्ग (nagpur chandrapur highway) लगत आहे. यामुळे गेल्या १५ वर्षात तब्बल ७ वेळा ही बँक फोडली गेली आहे. यातील काही प्रयत्न यशस्वी तर काही अपयशी ठरलेत.

दरम्यान काल रात्री १२ ते १२:३० च्या दरम्यान बँकेला लागून असलेल्या ग्रामपंचायतची खिडकी तोडून चोरांनी बँकेत शिरण्याचा प्रयत्न केला. या बॅंके शेजारीच असलेल्या रमेश ठवरी यांच्या घरातील कुत्री भुंकायला लागल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस पाटील आणि ग्रामपंचायत कर्मचा-यांना ही माहिती दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वांनी बँकेकडे धाव घेताच चोरांनी धूम ठोकली. चोरांनी आपला माग मिळू नये म्हणून ग्रामपंचायतमधील सीसीटीव्ही कॅमेरा आणि डीव्हीआर पळवून नेला आहे. गेल्या १५ वर्षांत ही बँक तब्बल ७ वेळा फोडण्याचा प्रयत्न झाल्यामुळे परिसरात घटनेची मोठी चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT