Mid Day Meal : पोषण आहारावर डल्ला मारणारे तिघे जेरबंद, वर्धा पाेलीसांची धडाकेबाज कामगिरी (पाहा व्हिडिओ)

एका संशयितांचा पाेलीस शाेध घेताहेत.
 wardha police arrests three for illegal stock of mid day meal scheme
wardha police arrests three for illegal stock of mid day meal schemesaam tv
Published On

- चेतन व्यास

Wardha News :

वर्धा जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर डल्ला मारणाऱ्यांना पोलीसांनी अटक केली आहे. पाेलीसांनी संशयितांकडून ८ लाख ६९ हजार ८१० रुपयांचा पोषण आहार जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत तिघांना अटक करण्यात आली असून एकाचा शाेध सुरु आहे. (Maharashtra News)

भारतीय खाद्य निगमच्या गोदामून निघणारा पोषण आहार शाळेत न पोहचता थेट पुरवठादारांच्या खासगी गोदामात साठविल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार पोलीसांनी उघडकीस आणला आहे.

या कारवाईमुळे विद्यार्थ्यांकारिता असलेल्या शालेय पोषण आहारावर डल्ला मारत आपल्या तुंबड्या भरण्याचे काम कंत्राटदारासह पुरवठादारांचे चालले हाेते हे वर्धा जिल्ह्यात उघडकीस आले आहे.

 wardha police arrests three for illegal stock of mid day meal scheme
Dehu News: वारकरी संप्रदाय आक्रमक, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्धार; उद्या देहू बंदची हाक

या कारवाईने पोषण आहाराच्या काळ्या बाजारात सहभागी असलेल्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाग्राम येथील औद्योगिक वसाहतीतील गोदामात करण्यात आली. सुमारे ८ लाख ६९ हजार ८१० रुपयांये किंमतीचा पोषण आहार जप्त करीत तिघांना बेड्या ठोकल्या आहे तर एकाचा शाेध सुरु आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संशयितांमध्ये किशोर नारायण तापडीया (रा. रामनगर), विनोद बबन भांगे (रा. बोरगाव मेघे), शेख रहीम शेख करीम (रा. स्वस्तीक नगर, सावंगी, मेघे) यांचा समावेश आहे. तर कंत्राटदार अंकित सतीश अग्रवाल (रा. मुर्तीजापुर) याचा शाेध सुरु आहे.

पोलिसांच्या धाडीनंतर जप्त पोषण आहाराची शिक्षणाधिकारी मार्फत तपासणी करण्यात आली. शिक्षणाधिकारी सचिन नागनाथ जगताप यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी जिवनावश्यक वस्तु अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Edited By : Siddharth Latkar

 wardha police arrests three for illegal stock of mid day meal scheme
Wardha: पीक विमा न काढलेल्या साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा सरकारने विचार करावा : आमदार रणजित कांबळे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com