Dehu News: वारकरी संप्रदाय आक्रमक, सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रसंगी महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्धार; उद्या देहू बंदची हाक

आज आंदाेलनाचा चौथा दिवस उजाडला.
villager call dehu bandh tomorrow
villager call dehu bandh tomorrow saam tv
Published On

Maval News :

देहूनगर पंचायत हद्दीतील सरकारी गायरान वाचवण्यासाठी संत तुकाराम महाराज संस्थान (sant tukaram maharaj sansthan dehu), नगरपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराज यांच्या महाद्वारासमोर गेल्या चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. या आंदाेलनाचा एक भाग म्हणून देहू गाव बंद (villagers call dehu bandh tommorow) ठेवण्याचा निर्धार आंदाेलकांनी केला आहे. (Maharashtra News)

नगरपंचायतीच्या हद्दीत गायरानाची सुमारे दीडशे एकर जागा शिल्लक आहे. या जागेपैकी 50 एकर जागा पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयास देण्यासाठी शासन दरबारी हालचाली सुरू आहेत. मात्र ही जागा देण्यास ग्रामस्थ, देहू संस्थान आणिनगरपंचायत सदस्यांचा विरोध आहे.

villager call dehu bandh tomorrow
Katraj Dudh : पुणेकरांना दिलासा, कात्रज दूध दरात कपात; जाणून घ्या नवा दर

भविष्यात सरकारी गायरान जागेवर नगरपंचायत कार्यालय पालखीतळ वाहन क्रीडांगण भक्तनिवास असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे भाविक आणि स्थानिक नागरिकांचे हित लक्षात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात जागा देण्यास ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वांचा विरोध असूनही शासनाकडून पोलीस आयुक्तालयास जागा देण्यात हालचाली सुरू आहेत. देहू नागरिकांच्या वतीने जागा देऊ नये यासाठी शासकीय शासनाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तसेच दोन वेळा मोजणीस नागरिकांनी विरोध केला.

पिंपरी चिंचवडच्या अप्पर तहसीलदार डॉक्टर अर्चना निकम यांनी उपोषणस्थळी भेट दिली तसेच उपोषण सोडण्याची विनंती करून शासनाकडे म्हणणे मांडण्याचे आश्वासन दिले. मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केला.

आज आंदाेलनाचा चौथा दिवस उजाडला. तरी अद्याप सरकारने काेणतेच पाऊल उचलले नाही. त्यामुळे देहूकर आता आक्रमक झालेले आहेत. उद्या देवस्थान आणि ग्रामस्थांनी देहू बंदची हाक दिली आहे.

villager call dehu bandh tomorrow
Pune Bangalore National Highway Traffic Update : पडळकरांसह हजाराे धनगरांनी राेखला पुणे-बंगळूर महामार्ग, वाहतूक ठप्प

अन्यथा महाराष्ट्र बंदचे आवाहन करु

त्यानंतर रविवारी देहूतील मार्ग चहुबाजूंनी बंद केली जाणार असल्याचे आंदाेलकांनी सांगितले. दरम्यान त्यानंतर ही सरकार जागं झालं नाही तर वारकरी सांप्रदाय महाराष्ट्र बंद ठेवण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुरुषोत्तम मोरे महाराज (अध्यक्ष देहू देवस्थान) तसेच संजय महाराज मोरे (विश्वस्त देवस्थान) यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली.

Edited By : Siddharth Latkar

villager call dehu bandh tomorrow
MNS Protest For Marathi Patya: मनसैनिकांनी इंग्रजी पाट्या फाेडल्या, शहापूर, वर्धामध्ये मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; पुण्यात आज आंदाेलन

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com