Thailand Job Scam Saam Tv
महाराष्ट्र

Thailand Job Scam: थायलंडमध्ये नोकरीचं आमिष, ८०० भारतीय ओलीस; 'गोल्डन ट्रँगल'च्या जाळ्यात तरुण कसे अडकले?

Thailand job scam 800 Indians held hostage: थायलंड- म्यानमार सीमेवर ८०० भारतीय तरुणांना ओलीस ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यामधील २५ तरुण बीडचे आहेत.

Priya More
  • थायलंड जॉब स्कॅममध्ये ८०० भारतीय अडकल्याची धक्कादायक माहिती उघड

  • महाराष्ट्रातील २५ तरुणांना गोल्डन ट्रँगल परिसरात ओलीस ठेवले

  • तरुणांकडून १८-१९ तास काम करून घेतले जाते

  • बंदुकीच्या धाकावर तरुणांचा छळ केला जातोय

योगेश काशिद, बीड

थायलंडमध्ये मोठ्या पगाराच्या नोकरीचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांसह तब्बल ८०० भारतीयांना म्यानमार सीमेवर ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणांना बंदुकीच्या धाकावर १८-१८ तास सायबर फसवणुकीचं काम करण्यास भाग पाडलं जातं आहे. नकार दिल्यास त्यांना विजेचे शॉक आणि अमानुष मारहाण केली जात आहे. या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटमधून तरुणांच्या सुटकेसाठी बीड पोलिसांनी थेट परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला.

मिळालेल्या माहितीनुसार, चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून महाराष्ट्रातील २५ तरुणांना म्यानमार-थायलंड सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रँगल' परिसरात ओलिस ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. म्यानमार, थायलंड आणि लाओस या देशांच्या सीमा जिथे मिळतात त्या भागाला आंतरराष्ट्रीय स्तरावर 'गोल्डन ट्रँगल' म्हटले जाते. बीडमधील एका तरुणाच्या धक्कादायक फोनमुळे मानवी तस्करी आणि सायबर फसवणुकीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे.

पीडित तरुणांच्या माहितीनुसार, बंदुकीच्या धाकावर त्यांच्याकडून दिवसाचे १८ ते १९ तास ऑनलाइन फसवणुकीचे काम करून घेतले जात आहे. काम करण्यास नकार दिल्यास मारहाण, विजेचे शॉक आणि अमानुष छळ केला जात असल्याचे गंभीर आरोप त्यांनी केले आहेत. या प्रकरणी बीड सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तातडीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधला आहे. अडकलेल्या सर्व तरुणांच्या सुरक्षित सुटकेसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवर युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विश्वास नागरे पाटील आज स्वीकारणार नागपूर पोलिस आयुक्तपदाचा पदभार

वजन कमी होत नाही, चेहरा पण डल दिसतोय? सकाळी प्या 'हे' हेल्दी ड्रिंक

Health Care : पावसाळ्यात १०० आजारांवर एक उपाय 'आयुर्वेदिक चहा', वाचा फायदे

Ketan Agarwal Case: बालीला जाताना केतन-सिया यांच्यात कारमध्ये काय-काय घडलं? चालकाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम

Monday Horoscope: जुन्या मित्रांची भेट होईल, ५ राशींच्या व्यक्तींनी रागावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT