Shocking : बीड हादरलं! दळण आणायला गेलेल्या मुलीला तरुणाने रस्त्यात गाठलं; जबरदस्ती करत घरात नेलं अन्..

Beed Crime News : बीडच्या अंबाजोगाईमध्ये धक्कादायक प्रकार! दळण आणायला गेलेल्या १६ वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
beed 16 years old girl rape case
beed 16 years old girl rape case Saam tv
Published On
Summary
  • बीडच्या अंबाजोगाईमध्ये धक्कादायक प्रकार!

  • दळण आणायला गेलेल्या १६ वर्षीय मुलीला मारहाण करून तिच्यावर बलात्कार

  • याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल

  • पोलीस पुढील तपास करत आहेत

Maharashtra Beed Rape Case News बीडमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अंबाजोगाई तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जबरदस्ती मारहाण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी घरातील दळण आणण्यासाठी गावातील पिठाच्या गिरणीकडे पायी जात होती. यावेळी आरोपी रमेश्वर बंडे याने तिचा रस्ता अडवला. त्यानंतर तिला जबरदस्तीने जवळील एका घरात नेल्याचा आरोप आहे. मुलीने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने तिला मारहाण करून धमकावले. भीतीचे वातावरण निर्माण करत तिच्यावर दोन वेळा लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

beed 16 years old girl rape case
Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडिता कशीबशी तेथून बाहेर पडली आणि घरी पोहोचली. तिने संपूर्ण घडलेला प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी तत्काळ अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली.

beed 16 years old girl rape case
Maharashtra Rain Update : राज्यात मान्सून सक्रीय! २९ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; जाणून घ्या हवामानाचा अंदाज

पोलिसांनी पीडित मुलीचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी केली. प्राथमिक चौकशी आणि उपलब्ध माहितीच्या आधारे आरोपी रमेश्वर बंडे याच्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com