Beed : बस स्थानकात काळाचा घाला! जागा पकडण्याच्या घाईत प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू

Beed Accident News : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकात एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी धावत असलेल्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद.
TRAGIC INCIDENT AT AMBAJOGAI BUS STAND: PASSENGER DIES WHILE RUNNING TO BOARD ST BUS, CCTV VIDEO GOES VIRAL
TRAGIC INCIDENT AT AMBAJOGAI BUS STAND: PASSENGER DIES WHILE RUNNING TO BOARD ST BUS, CCTV VIDEO GOES VIRALSaam Tv
Published On
Summary
  • अंबाजोगाई बस स्थानकात एसटी बस पकडण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा मृत्यू

  • संपूर्ण घटना बस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

  • प्राथमिक माहितीनुसार हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाल्याची शक्यता

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई बस स्थानकात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एसटी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी सुरू असलेल्या धावपळीत एका प्रवाशाचा जीव गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना बस स्थानकातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २५ जून रोजी दुपारी सुमारे १.४५ वाजता अंबाजोगाई बस स्थानकात घडली. बस स्थानकातून एक एसटी बस पुढे जात असताना अनेक प्रवासी बसमध्ये जागा मिळवण्यासाठी तिच्या दिशेने धावत होते. यावेळी बसच्या मागे धावत असलेल्या प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही प्रवासी बसच्या पाठीमागे वेगाने धावताना दिसतात.

TRAGIC INCIDENT AT AMBAJOGAI BUS STAND: PASSENGER DIES WHILE RUNNING TO BOARD ST BUS, CCTV VIDEO GOES VIRAL
Bribe Case : धक्कादायक! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं, शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी घेतली लाच

याच दरम्यान एका धावणाऱ्या प्रवाशाचा दुसऱ्या प्रवाशाला जोरदार धक्का लागला. अचानक झालेल्या या धक्क्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो थेट चालत्या बसच्या मागील चाकाजवळ पडला. अपघातात त्याचा हात बसच्या चाकाखाली आल्याचे दिसून येते. तसेच खाली पडल्याने त्याच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली, मात्र परिस्थिती गंभीर होती.

TRAGIC INCIDENT AT AMBAJOGAI BUS STAND: PASSENGER DIES WHILE RUNNING TO BOARD ST BUS, CCTV VIDEO GOES VIRAL
Bird Facts : प्रत्येक पक्षाची चोच वेगळी का असते? ९९% लोकांना माहिती नसेल कारण

या घटनेबाबत अंबाजोगाई आगाराचे प्रमुख राऊत यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित प्रवासी बसमध्ये जागा मिळवण्याच्या प्रयत्नात धावत होता. त्यावेळी तो अचानक खाली पडला आणि त्याचा हात बसच्या मागील चाकाखाली आला. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या घटनेमुळे सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com