उबाठा सेनेचे उपनेते अद्वय हिरे, उबाठा सेनेचे नाशिक जिल्हाप्रमुख पवन ठाकरे, छत्रपती संभाजीनगरचे माजी उपमहापौर राजू शिंदे, उबाठा गटाचे संभाजीनगर जिल्हा संघटक भरतसिंग राजपूत, यांच्यासह उबाठाच्या अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सांगली जिल्ह्यातील उद्योजक व वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, इतर मागास कल्याण मंत्री अतुल सावे, ज्येष्ठ नेते भाई गिरकर, आ. सत्यजित देशमुख, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. संजय केनेकर, खा. डॉ.भागवत कराड, संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे, ग्रामीण अध्यक्ष संजय खंबायते, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, शिरीष बोराळकर, सुनील आबा गायकवाड, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने देशात, राज्यात मोठी विकास कामे केली आहेत. ज्या विश्वासाने या कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे तो विश्वास सार्थ ठरवू. नाशिक, मालेगाव महापालिकेवर आणि नाशिक जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आणण्यासाठी आपण निर्धाराने प्रयत्न करू, असे हिरे यांनी नमूद केले. छत्रपती संभाजीनगर महापालिकेवर आणि जिल्हा परिषदेवरही भाजपाचा झेंडा फडकावू, असा विश्वास राजू शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
राजू शिंदे यांच्यासमवेत अजय शिंदे, युवराज भालेराव, गोरख देहाडे, संदीप शिंदे माजी नगरसेवक प्रकाश गायकवाड, गोकुळ मलके, माजी पंचायत समिती सदस्य सतीश पाटील, अभिजित पाटील, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड - सोयगाव विधानसभा क्षेत्रातील जिल्हा परिषदेचे माजी सभापती धनराज बेडवाल, उबाठाचे उपजिल्हाप्रमुख नितीन राठोड, स्वप्नील दहिभाते, कैलास वाणी, रामभाऊ पेरकर, राहुल निकम, अनिल वाणी आदींचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये समावेश आहे.
अद्वय हिरे यांच्या बरोबर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये उबाठा गटाचे जिल्हा समन्वयक सुरेश गवळी, मालेगाव बाजार समिती संचालक नंदलाल शिरोळे, युवासेना जिल्हा प्रमुख मनोज जगताप, विनोद बोरसे, रवींद्र सूर्यवंशी, काशिनाथ पवार आदी कार्यकर्त्यांचा समावेश आहे. वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक विजय पाटील यांच्यासमवेत सुरेश पाटील, शिवाजी पवार, प्रकाश पाटील आदींनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.