

साताऱ्यात भाजपने उघडलं विजयाचे खातं
भाजपच्या विजयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का
भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी
धुळ्यानंतर आता साताऱ्यातही भाजपने विजयाचे खातं उघडलं आहे. निवडणुकीच्या मतदानाआधी भाजपचे एकाचवेळी ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. साताऱ्यातील भाजपच्या विजयाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. अर्ज छाननीत भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
साताऱ्यात भारतीय जनता पक्षाने नगरपरिषदेत विजयाचे खाते उघडले आहेत. निवडणुकीच्या निकालाआधी भाजपच्या उमेदवारांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. अर्ज छाननीत मलकापूर नगरपरिषदेत भाजपचे पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. साताऱ्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. आमदार अतुल भोसले यांचा करिष्मा चालल्याची चर्चा आहे. आमदार अतुल भोसले नेतृत्वातील मलकापूर नगरपरिषदेत कमळ फुललं आहे.
मलकापूर नगरपरिषदेतील प्रभाग क्रमांक 4 मधून सुनिल खैरे, प्रभाग क्रमांक 7 मधून - हणमंतराव जाधव, सुनीता पोळ, प्रभाग क्रमांक 9 मधून जोत्सना शिंदे, दिपाली पवार विजयी झाले आहेत.
रायगड जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना पेण नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वसुधा पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत. वसुधा पाटील पेणच्या रामवाडी येथील प्रभाग क्रमांक 9 मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांच्या विरोधात कोणत्याही उमेदवाराने अर्ज भरला नाही. वसुधा पाटील यांची नगरसेवकपदाची ही सहावी टर्म असून यापूर्वी पाच वेळा याच प्रभागातून मोठ्या फरकाने निवडून आल्या होत्या. खासदार सुनील तटकरे यांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.