ऐन निवडणुकीत IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; जाणून घ्या कोणत्या अधिकाऱ्याची कुठे झाली बदली?

IAS Officers : महाराष्ट्र सरकारने पाच आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केलेत. राहुल रंजन महिवाल यांची महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे येथे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.
IAS Officers
Maharashtra Government announces transfer of five IAS officers amid election preparations.India Today
Published On
Summary
  • राज्य शासनाने पाच वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.

  • महाराष्ट्र शासनाने हे बदली आदेश १८ नोव्हेंबर २०२५ रोजी जारी केले आहेत.

  • राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरूय.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्याच दरम्यान राज्यातील पाच IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाने 18 नोव्हेंबर 2025 रोजी महत्त्वाचे आयएएस अधिकाऱ्यांचे बदल्या व बदली आदेश जारी केले आहेत. या ताज्या आदेशानुसार पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची नवीन पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. राहुल रंजन माहीवाल (IAS 2005) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट फार्मिंग कॉर्पोरेशन, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रकाश खापले (IAS 2013) यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट फिशरीज कॉर्पोरेशन, मुंबई पदावर बदली करण्यात आली आहे.

डॉ. मंजीरी मनोळकर (IAS 2016) यांची आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI), पुणे या पदावर नेमणूक झाली आहे.

त्रिगुण कुलकर्णी (IAS 2016) यांची अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC-HSC Board), पुणे पदावर बदली झाली आहे.

अंजली रमेश (IAS 2020) यांची आयुक्त, मृदा व जलसंधारण विभाग, छत्रपती संभाजीनगर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बदली आदेशानुसार त्रिगुण कुलकर्णी यांची इयत्ता १० वी आणि १२ वी शिक्षण बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलीय. त्रिगुण कुलकर्णी सध्या पुण्यातील सनदी अधिकाऱ्यांसाठीची प्रशिक्षण संस्था असलेल्या यशदा येथे उपमहासंचालक पदावर कार्यरत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com