Maharashtra Politics : घराणेशाहीचा रेकॉर्ड मोडला; भाजप अन् शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

Maharashtra Political News : भाजप आणि शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी दिली आहे.
Maharashtra political
Maharashtra political Saam tv
Published On
Summary

स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाची घराणेशाही

भाजप आणि शिंदे गटाकडून एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत

स्थानिक स्वराज्य निवडणुकीची रणधुमाळी राज्यातील सर्वत्र पाहायला मिळत आहे. भाजप आणि शिंदे गटाकडून उमेदवार देखील जाहीर करण्यात आले आहेत. घराणेशाहीला विरोध करून सत्तेत आलेल्या पक्षाकडून एकाच कुटुंबातील ६ सदस्यांना उमेदवारी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. भाजपने नांदेडच्या लोहा नगरपरिषदेत एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बदलापुरात शिंदे गटाने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवार देण्यात आली आहे. यामुळे घराणेशाहीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अस बोलल्या जातं. मात्र प्रत्यक्षात पाहता अनेक जिल्ह्यात मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या कुटुंबातील सदस्याला आणि नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचे चित्र पहायला मिळत आहे. नांदेड जिल्हातील लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपने चक्क एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी दिल्याचे समोर आलं आहे.

Maharashtra political
Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

नगराध्यक्षपदासाठी भाजपने गजानन सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर नगरसेवकपदासाठी गजानन सूर्यवंशी यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी, भाऊ सचिन सूर्यवंशी, भावाची पत्नी सुप्रिया सचिन सूर्यवंशी, मेव्हुणा युवराज वाघमारे, भाच्याची पत्नी रीना अमोल व्यवहारे यांना उमेदवारी दिली आहे. पक्षात घराणेशाही चालत नाही म्हणणाऱ्या भाजपने एकाच घरातील सहा जणांना उमेदवारी दिल्याने चर्चेचा विषय बनला आहे.

बदलापुरातही एकाच कुटुंबातील ६ जणांना उमेदवारी

बदलापूर नगरपरिषदेसाठीही भाजप आणि शिंदे गटात चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीसाठी शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे, पत्नी वीणा म्हात्रे, भाऊ तुकाराम म्हात्रे आणि त्यांची पत्नी उषा म्हात्रे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच वामन म्हात्रे यांचे पुत्र वरूण म्हात्रे, पुतण्या भावेश म्हात्रे यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे.

Maharashtra political
Mumbai : राज्यात आणखी ५०० कोटींचा घोटाळा; अंजली दमानिया यांचा अजित पवारांवर गंभीर आरोप

बदलापुरात १२ दाम्पत्य रिंगणात

भाजपचे ६ दाम्पत्य

राजेंद्र घोरपडे आणि नगराध्यक्षपदासाठी त्यांच्या पत्नी रूचिता घोरपडे

संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नी उर्मिला संभाजी शिंदे

रमेश सोळशे-हर्षदा सोळसे

शरद तेली- कविता तेली

सुरज मुठे-संध्या मुठे

सागर घोरपडे-निशा घोरपडे

Maharashtra political
Kalyan : कल्याणचा स्कायवॉक फेरीवाल्यांनी गिळला; प्रशासन मूग गिळून गप्प, कारवाई करणार की नाही?

शिंदे गटातील ५ दाम्पत्य

वामन म्हात्रे-विणा म्हात्रे

तुकाराम म्हात्रे-उषा म्हात्रे,

प्रवीण राऊत-शीतल राऊत,

श्रीधर पाटील-स्वप्ना पाटील,

जयश्री भोईर - मुकुंद भोईर

रासप

रुपेश थोरात-सुषमा थोरात

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com