Aadhar card : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलू शकतो? ९० टक्के लोकांना उत्तर माहीत नाही

Aadhar card name change : आधार कार्डावरील नाव किती वेळा बदलता येते, तुम्हाला ठाऊक आहे का? अनेकांना याची माहिती ठाऊक नसेल. जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Aadhar card news
Aadhar card Saam tv
Published On
Summary

नियमानुसार, आधार कार्डावरील नाव जास्तीत जास्त 2 वेळा बदलता येतं

पहिला आणि दुसरा बदल कोणत्याही सामान्य कारणासाठी करता येतो.

आधार कार्डावरील नाव बदलणे किंवा दुरुस्तीसाठी 50 रुपये शुल्क आकारले जाते.

तिसऱ्यांदा नाव बदलण्यासाठी UIDAIची विशेष परवानगी

Aadhaar Card Name change : भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड हा महात्वाचा पुरावा मानला जातो. आधार कार्डाशिवाय आता केवायसी देखील होऊ शकत नाही. तसेच बँक खाते उघडण्यासाठी देखील आधारकार्ड हाच महत्वाचा पुरावा मानला जातो. या आधारकार्डाचे अनेक फायदे आहेत. याच महत्वाच्या आधारकार्डावरील नाव, पत्ता दुरुस्तीसाठी अनेक नियम आखण्यात आले आहेत.

तुम्ही आधारकार्ड तयार केल्यानंतर पहिल्यांदा नावात बदल करू शकता. परंतु दुसऱ्यांदाही आधारकार्डावरील नावात चूक झाली, तर काय करू शकता? आधारकार्डावरील नावात किती वेळा दुरुस्ती करू शकता, तुम्ही किती वेळा नाव बदलू शकता? जाणून घ्या.

Aadhar card news
Amit Thackeray : मोठी बातमी! मनसे नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

तुम्ही नाव किती वेळा बदलू शकता?

आधार कार्डावरील वैयक्तिक माहिती म्हणजे नाव, पत्ता यासारखी माहिती अपडेट करण्यासाठी UIDAIचे काही नियम आहेत. या नियमानुसार, आधारकार्डावरील नाव २ वेळा बदलू शकतो. कार्डावरील दुरुस्ती, लग्नानंतर नावात बदल करण्याची परवानगी मिळते. ही दुरुस्ती करण्यासाठी ५० रुपये आकारले जातात. एका व्यक्ती दोन वेळा नावात बदल करू शकतो.

Aadhar card news
अपहरण करून तरुणाला गुजरातला नेलं; लैगिंक अत्याचारानंतर जबरदस्तीने लिंगबदल शस्त्रक्रिया, मुंबईतील ट्रान्सजेंडर टोळीचा कारनामा

तुम्हाला तिसऱ्यांदा नावात बदल करायचा असेल, त्यासाठी तुम्हाला विशेष परवानगी आणि नेमकं कारण द्यावे लागते. तुम्हाला विशेष परवानगी मिळाल्यानंतर तुम्ही तिसऱ्यांदा नावात बदल करू शकता.

Q

तुम्ही आधार कार्डातील नाव किती वेळा बदलता येते?

A

तुम्ही UIDAIच्या नियमानुसार दोन वेळा नाव बदलण्याची परवानगी आहे.

Q

नाव बदलण्यासाठी किती शुल्क लागते?

A

तुम्हाला आधार कार्डातील नाव दुरुस्तीसाठी ५० रुपये शुल्क आकारले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com