Nashik Crime: संकटमोचक गिरीश महाजन नाशिक दौऱ्यावर, भाजपच्या माजी नगरसेवकच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, राजकारणात खळबळ

Girish Mahajan Nashik Visit Amid BJP Corporators Arrest: नाशिकच्या पंचवटी भागातील सागर जाधव गोळीबार प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
Police escort BJP’s former corporator Jagdish Patil after arrest in Nashik firing case.
Police escort BJP’s former corporator Jagdish Patil after arrest in Nashik firing case.Saam Tv
Published On
Summary

नाशिकच्या पंचवटी भागातील गोळीबार प्रकरणात भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील अटकेत.

मंत्री गिरीश महाजन यांच्या नाशिक दौऱ्यादरम्यान पोलिसांनी कारवाई केली.

राहुल धोत्रे हत्याकांडात भाजपचे दुसरे माजी नगरसेवक उद्धव निमसे देखील अटकेत.

आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत भाजपच्या प्रतिमेला धक्का बसण्याची शक्यता.

नाशिक शहरातील पंचवटी भागात काही दिवसांपूर्वी घडलेल्या सागर जाधव गोळीबार प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. महत्वाचे म्हणजे मंत्री गिरीश महाजन हे नाशिकमध्ये शनिवारी रात्री दाखल झाले आणि आज पोलिसांनी जगदीश पाटील यांना अटक केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Police escort BJP’s former corporator Jagdish Patil after arrest in Nashik firing case.
Laxman Hake : शासनाला GR काढायचा अधिकार नाही, उपाययोजना ओबीसी आरक्षण संपवणारी; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

काही दिवसांपूर्वी पंचवटी येथील फुलेनगर भागात सागर विठ्ठल जाधव या युवकावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या तपासात या हल्ल्यामागे पूर्ववैमनस्य आणि टोळीयुद्ध असल्याचे समोर आलेय. पोलिसांनी या प्रकरणात 11 आरोपींना अटक केली होती. तर दोन आरोपी अद्यापही फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Police escort BJP’s former corporator Jagdish Patil after arrest in Nashik firing case.
Nashik Crime : नाशिक पोलिसांची मोठी कारवाई; भाजपच्या नेत्याला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ

या तपासादरम्यान भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील यांचा देखील यामध्ये समावेश असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी त्यांना आज अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलेय. यामुळे नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Police escort BJP’s former corporator Jagdish Patil after arrest in Nashik firing case.
BJP : ऑफिसमध्ये आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह, गळफास घेत आयुष्य संपवलं; कारण...

काही दिवसांपूर्वीच माजी नगरसेवक उद्धव निमसेला अटक

राहुल धोत्रे हत्याकांड प्रकरणी अनेक दिवस फरार असलेला भाजपचा माजी नगरसेवक उद्धव (बाबा) निमसे याला देखील पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. येणाऱ्या काही दिवसातच स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होणार आहे आणि तत्पूर्वी भाजपच्या दोन माजी नगरसेवकांना अटक केल्याने पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत याचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com