बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण आणि खंडणी प्रकरणी तुरुंगात असलेल्या आरोपी वाल्मिक कराडबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड आणि त्याच्या गँगची तुरूंगामध्ये अजूनही दहशत आहे. बीडचे विभागीय पोलीस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा धक्कादायक जबाब साम टीव्हीच्या हाती लागला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ उडाली. एसआयटीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्या उपस्थितीमध्ये २३ फेब्रुवारी रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा जबाब नोंदवण्यात आला होता.
वाल्मिक कराडची २०१४ पासून संपूर्ण बीड जिल्ह्यात दहशत आहे. तो सध्या जेलमध्ये असला तरी त्याच्या कार्यकर्त्याची बीड उपविभागात दहशत कायम असल्याचा जबाब बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विशंभर गोल्डे यांच्या जबाबदातून उघड झाली आहे. कराड हा गुंड असल्याची माहिती असतानाही बीड पोलिसांकडून दोन कर्मचारी देऊन कराडला संरक्षण देत होते हे उघड झाले आहे. गोल्डे यांच्या जबाबामुळे बीड पोलिस नव्या वादात सापडले आहेत.
सीआयडीचे उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली यांना विश्वंभर गोल्ड यांनी २३ फेब्रुवारी २०२५ रोजी जबाब दिला होता. अवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यात वाल्मिक कराडला सीआयडीने ३१ डिसेंबर २०२४ रोजी पुण्यातून अटक केली होती आणि त्यानंतर ६ जानेवारी रोजी कराड समर्थक आणि बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात पहाटेपर्यंत गोंधळ घालत अटकेचा निषेध केला होता. त्यानंतर कराड हा मस्साजोग सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी झाला. त्याला बीडचा विशेष मकोका न्यायालयात हजर केले. यावेळी काही लोकांनी हातात दगड घेत गोंधळ घातला होता. परंतू आपण परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा गोल्डे यांनी केला आहे.
उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या वाक्याने संभ्रम वाढला आहे. ९ डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांचे अपारण करून हत्या झाली. याच गुन्ह्यात वाल्मीक कराडला ३१ डिसेंबर २०२४ रोजी ताब्यात घेतल्याचा दावा उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे यांचा आहे. परंतू तेव्हा त्याला खंडणीच्या गुन्हा ताब्यात घेतले होते. साधारण १५ दिवसानंतर कराडला कोणाच्या गुन्ह्यात आरोपी केले होते. विश्वंभर गोल्डे यांच्या या जबाबामध्ये संभ्रम आणि नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1) बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांचा एसआयटीचे प्रमुख डॉक्टर बसवराज तेली यांच्या उपस्थितीत जबाब.
2) आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये असतानाही कार्यकर्त्यांची बाहेर दहशत.
3) आरोपीच्या अटकेच्या विरोधात समर्थकांची शिवाजीनगर पोलिस ठाण्याबाहेर गोंधळ घातला.
4) आरोपी कराडला मी बीडच्या न्यायालयात आणले असता समर्थकांची दगडफेक.
5) आरोपी वाल्मिक कराडची गेल्या अनेक दिवसांपासून बीडमध्ये दहशत.
6) आरोपी वाल्मिक कराड गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असतानाही बीड पोलिसांकडून दोन पोलिस गार्डचे संरक्षण.
7) बीडचे उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वंभर गोल्डे यांच्या जबाबांमध्ये खळबळजनक माहिती समोर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.