Chhava Sanghatana Protest Saam Tv
महाराष्ट्र

Chhava Sanghatana: छावा कार्यकर्त्याला मारहाण, जालन्यात राष्ट्रवादीचे कार्यालय पेटवण्याचा प्रयत्न; नांदेडमध्ये टायर जाळून आंदोलन

Chhava Sanghatana Protest: छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मारहाण केल्या प्रकरणाचे पडसाद आता राज्यभरात उमटू लागले आहे. जालन्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यालयावर दगडफेक करत ते जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Priya More

लातूरमध्ये छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मारहाण करण्यात आली होती. या घटनेचा राज्यभरातून निषेध केले जात आहे. या घटनेचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. जालन्यात छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जालना शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यालयावर दगडफेक केली. तसंच, जालन्याच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण यांच्या कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्न करण्यात आला

रविवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली होती. सुनील तटकरे यांच्या पत्रकार परिषदेत छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्ते फेकून माणिकराव कोकाटे यांच्या रम्मी खेळाबाबत जाब विचारला होता. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण केली आता या घटनेचे प्रसाद नांदेडमध्ये सुद्धा उमटत आहेत. या घटनेनंतर जालन्यात छावा संघटना आक्रमक झाली असून थेट अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयावर रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक करून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. सध्या जिल्ह्यामध्ये तणावाचे वातावरण आहे.

छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्या प्रकरणाच्या निषेधार्थ नांदेड शहरातील जिल्हा परिषद कॉम्प्लेक्स समोर टायर जाळून आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी विजय घाडगे यांना झालेल्या मारहाणीचा निषेध करण्यात आला. आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची यात्रा जिल्ह्यात फिरू देणार नाही असा इशारा छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.

'अजित दादाचा पक्ष हा सत्तेचा मस्तीचा पक्ष आहे. शेतकरी नेते विजय घाडगे यांनी कृषी मंत्र्याचा व्हिडिओ सुनील तटकरे यांना दाखवून असा जर कृषिमंत्री असेल तर राज्यात शेतकऱ्यांचं काय बोलणार आहे असा जबाब विचारला. तेव्हा सूरज चव्हाण यांनी गुंड बोलावून त्यांना मारहाण केली असा आरोप करण्यात आला आहे. तुमची यात्रा उद्या मुंबईला घेऊन जा शेतकरी आणि मराठा समाज तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.' असा इशारा छावा संघटनेच्या दशरथ कपाटे यांनी दिला आहे.

दरम्यान, लातूरमधील राड्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आज धाराशिव दौऱ्यावर आहेत. आई तुळजाभवानी देवीचा आशीर्वाद घेऊन ते धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत. पण छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे धाराशिवमधील शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. काल झालेल्या हाणामारीच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आंदोलन होण्याची शक्यता आहे. समाज माध्यमातून देखील घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lunch Box: मुलांच्या डब्याला द्या 'हे' चमचमीत अन् हेल्दी पदार्थ

Chhagan Bhujbal: मराठा-ओबीसी आरक्षण संघर्ष उफाळला; छगन भुजबळांचा एल्गार पुन्हा घुमला

Fashion Tips: तुमची फिगर स्लीव्हलेस ब्लाउजसाठी योग्य आहे का? ब्लाउज घालण्यापूर्वी जाणून घ्या या फॅशन टिप्स

Manoj Jarange: ३ दिवसांच्या उपोषणानंतर मनोज जरांगे आक्रमक; उद्यापासून पाणीही सोडणार

Landslide: मोठी दुर्घटना! धौलीगंगा वीज प्रकल्पाच्या बोगद्यात भूस्खलन, १९ कामगार अडकले

SCROLL FOR NEXT