3 दिवसांपासून आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे याचं उपोषण सुरुय.. त्यांना पाठींबा देण्यासाठी राज्यभरातून जनसागर लोटलाय.. त्यातच आता मनोज जरांगेंनी सरकारला अखेरचा अल्टिमेटम दिलाय. सोमवारपासून थेट पाणी बंद करण्याचं अस्त्रं त्यांनी उगारलंय... त्यामुळं आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे....
3 दिवसाच्या उपोषणानंतर आता जरांगेंनी सरकारविरोधात फास आवळण्यासाठी टोकाचा निर्णय घेतलाय... मात्र जरांगेंचा हा टोकाचा निर्णय काय आहे? आणि त्यावर सरकारने काय भूमिका जाहीर केलीय? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट...
इकडे मनोज जरांगे मुंबईत दाखल होताच मुंबईत चक्काजाम झाला.. आणि वाहतूक व्यवस्था कोलमडली आणि सरकारच्या नाकात नऊ आले . त्यानंतर सरकारने तातडीने पावलं उचलंत मंत्रिमंडळ उपसमितीची रविवारी सुट्टी असतानाही दोनदा बैठक घेतली.. सरकारनं प्रस्ताव दिलाय मात्र त्याला यश येताना दिसत नाही .
काय आहे सरकारचा प्रस्ताव पाहूया
मात्र हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटनुसार कुणबी आणि मराठा एकच आहेत, असा जीआर काढण्याची मागणी जरांगेंनी केली.. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली.... आणि जरांगेंनी 1 सप्टेंबरपासून पाणी सोडण्याची टोकाची भूमिका घेतलीय. तर आंदोलकांनीही थेट मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिलाय..यातला मराठ्यांनी लाठ्याकाठ्याची लढाई लढली आता तलवारी काढायची वेळ आलीय, हा
त्यामुळे सरकार जरांगेंच्या मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढून आंदोलन शांत करायला हवं... अन्यथा मराठा आंदोलन चिघळणं फक्त सरकारचं नाही तर महाराष्ट्रालाही परवडणारं नाही...आणि भारत सरकारलाही ...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.