ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर तुम्हालाही मुलांच्या रोजच्या जेवणाच्या डब्यात काय द्यायचे याची काळजी वाटत असेल, तर आम्ही तुम्हाला काही चविष्ट आणि पर्याय सांगणार आहोत.
तुम्ही व्हेजिटेबल टिफिनमध्ये पोहे बनवू शकता. भाज्यांपासून बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पोहे मुलांच्या टिफिनसाठी परफेक्ट डिश आहे.
तुम्ही डब्यासाठी झटपट फ्राइड राईस बनवू शकता. यामध्ये भाज्या अन सॉसेस देखील घालू शकता.
तुम्ही ओट्स किंवा रव्यापासून इडली बनवू शकता. इडली हेल्दी असून यामुळे जास्त वेळ पोट भरलेले राहते.
तुम्ही तुमच्या मुलाला टिफिनमध्ये रवा उत्तपम देखील देऊ शकता. उत्तपममध्ये जास्त भाज्या घाला आणि सॉससोबत सर्व्ह करा.
भाज्या आणि पनीर घालून पराठा बनवा आणि रोल करा. मुलांनाही हे नक्की आवडेल.
तुम्ही मुलांना टिफिनमध्ये चीज कॉर्न सँडविच देखील देऊ शकता. मुलांना सँडविच खूप आवडतात आणि भाज्यांसोबत अजून टेस्टी लागेल.