ओबीसीतून आरक्षण मिळेपर्यंत उठणार नाही, असा निर्धार मनोज जरांगेंनी केलाय... त्याविरोधात ओबीसी समाजाने नागपूरमध्ये साखळी उपोषण सुरु केलंय.. तर लक्ष्मण हाकेंनी पुण्यात बैठक घेतलीय.. मात्र आता या आरक्षणाच्या लढ्यात जरांगेंनी आरपारचा नारा दिल्याने मंत्री छगन भुजबळ अॅक्शन मोडवर आलेत.. मंत्री छगन भुजबळांनी थेट मुंबईत ओबीसी नेत्यांची तातडीची बैठक बोलावलीय... मात्र या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे?
सरकारकडून 58 लाख नोंदींच्या माध्यमातून सरसकट कुणबीकरण सुरु असल्याने त्याला विरोध कऱण्यात येणार आहे. याच बैठकीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातील निकालांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.. एवढंच नाही तर हैदराबाद, सातारा आणि औंध संस्थानच्या गॅझेटच्या मागणीवरही चर्चा केली जाणार आहे... याबरोबरच मराठा समाजाच्या दबावाला सरकार बळी पडण्याची शक्यता असल्याने त्याबाबत रणनीती ठरवण्यात येणार आहे...
खरंतर 2023 मध्ये मनोज जरांगेंनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली.. त्यानंतर सरकारने शिंदे समितीची स्थापना करुन 57 लाख नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरु केलं.. नेमकं याच मुद्द्यामुळे मराठा समाजाचं कुणबीकरण सुरु झाल्यानं भुजबळांनी जालन्यातून हुंकार भरला आणि राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यातून रान पेटवलं...
आता मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह मुंबईत ठाण मांडून आहेत.. त्यापार्श्वभुमीवर भुजबळांनी पुन्हा एल्गार पुकारल्याने राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अटळ आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.