Collector Action Against Tahsildar saam tv
महाराष्ट्र

SSC Exam: मुलासाठी चक्क तहसीलदार शाळेत; जिल्हाधिकाऱ्यांचे फौजदारी कारवाईचे आदेश

Collector Action Against Tahsildar: कॉपी पुरवण्यासाठी विद्यार्थ्यांचे मित्र किंवा शाळेतील शिक्षकच कशी कसरत करतात हे यापूर्वी अनेक घटनांमधून आपण पाहिलं आहे. मात्र आता खुद्द तहसीलदारच आपल्या मुलाला कॉपी कशी पुरवतो त्यावरचा हा विशेष रिपोर्ट.

Girish Nikam

शासनाच्या कॉपीमुक्त अभियानाचा कसा फज्जा उडाला हे साम टीव्हीनं दहावीच्या पहिल्याच पेपरला दाखवलं होतं. जालन्यातील बदनापूरमध्ये मराठीचा पेपर सुरू असतानाच प्रश्नपत्रिका आणि त्याची उत्तर लिहून झेरॉक्स सेंटरवर विकल्या जात असल्याचा साम टीव्हीन पर्दाफाश केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती.

आता अहिल्यानगरमधला गंभीर प्रकार समोर आलाय. बारावीचा गुरुवारी बायलॉजीचा शेवटचा पेपर होता. यावेळी मुलाला कॉपी पुरवण्यासाठी चक्क नायब तहसिलदार शाळेत आले होते. आपला मुलगा पास व्हावा या काळजीनं धाव घेणाऱ्या या बापाचं नाव आहे अनिल तोरडमल. पण नशिबानं त्यांना साथ दिली नाही. भरारी पथकाच्या तावडीत ते सापडले. पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरील हा धक्कादायक प्रकार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. चक्क नायब तहसिलदाराविरोधातच कारवाई झाल्यानं खळबळ उडाली आहे. अनेक वर्षांपासून किडलेल्या व्यवस्थेत एखाद- दोन प्रकार घडू शकतात. मात्र पुढच्या वर्षी तेही दोष दूर होतील, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

यापूर्वी यवतमाळच्या महागावमध्ये केंद्र संचालकांनीच पेपर फोडल्याची बाब चौकशीतून समोर आलीय. तर संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्रीत मास कॉपीचा प्रकार समोर आला होता. जिल्हा परीषदेच्या सीईओंच्या पाहणी दौऱ्यात चक्क शिक्षकांनीच कॉपी पुरवल्याचं समोर आलं होतं. आता अहिल्यानगरमध्ये प्रशासनातील अधिकारीच कॉपी पुरवण्यात पुढाकार घेत असतील तर कॉपीमुक्त अभियानाचे तीन तेरा वाजणारच. शासन यापुढे काय कडक पाऊल उचलणार? याकडे सगळ्याचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharvari Wagh: माजी मुख्यमंत्र्यांच्या नातीचा मॉर्डन एथनिक लूक पाहिलात का?

भाजपला मोठा धक्का; शेकडो कार्यकर्त्यांसह माजी मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Asia Cup : रिंकू-सॅमसन OUT, केएल राहुल-पराग IN, आशिया चषकासाठी भज्जीने निवडला संघ, वाचा

Curd Health Effects: दहीसोबत हे ५ पदार्थ कधीही खाऊ नका

Astrology Tips: ११ मुखी रुद्राक्ष कोणाला घालावे आणि त्याचे आध्यात्मिक फायदे कोणते? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT