Minister Pratap Sarnaik: स्वारगेट अत्याचारकांडानंतर प्रशासनाला जाग; महामंडळात नेमणार IPS अधिकारी, बसेसमध्ये बसणार CCTV

Minister Pratap Sarnaik: स्वारगेट आगारातील अत्याचार प्रकरणाबाबत काय-काय चौकशी झाली याची महिती देण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषद घेतली.
Minister Pratap Sarnaik
Minister Pratap Sarnaiksaam tv
Published On

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील एका बसमध्ये अत्याचाराची घटना घडल्यानंतर महामंडळाला सुरक्षेबाबत जाग आलीय. एसटी बस आणि एसटी आगाराच्या सुरक्षेबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महामंडळाला निर्देश दिले आहेत. महामंडळात आयपीएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाणार आहे. आगारातील बंद पडलेल्या बसेस भंगारात काढले जाणार आहेत. एसटीच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिलीय.

स्वारगेटमधील बस आगारात मंगळवारी पहाटे एका २६ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. आगारात उभी असलेल्या शिवशाही बसमध्ये दत्तात्रेय गाडे नावाच्या व्यक्तीने मुलीवर अत्याचार केला होता. आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. एसटी महामंडळातील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित होत असल्याने आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची बैठक घेतली.

Minister Pratap Sarnaik
Pune Crime Swargate St Depot: ताई, कुठे जाताय...;पीडितेसोबत आरोपी नेमका काय बोलला, काय झाला संवाद?

या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी सरनाईक यांनी दिलीय. एसटी बसमध्ये जीपीआरएस लावले अनिवार्य केले गेले आहेत. तसेच आगारात ज्या बस बंद पडल्या आहेत, त्या भंगारात काढल्या जातील, तसेच आगारात असलेल्या काही फोर व्हिलर गाड्या पार्किंगमध्ये आहेत, त्याचा सुद्धा उपयोग काही समाजकंटक घेत असतात. त्यामुळे ह्या गाड्या १५ एप्रिलपर्यंत भंगारमध्ये काढण्यात येतील. आगारात स्वच्छता केली जाणार आहे.

Minister Pratap Sarnaik
Pune Crime: फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला नराधमाने जाळ्यात कसं ओढलं? धक्कादायक माहिती आली समोर

एसटीमध्ये २७०० सुरक्षा रक्षक आहेत, ते तीन एजन्सीमार्फत निवडण्यात आली आहेत.त्यात महिलांची संख्या कमी आहे, त्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या १५ ते २० टक्के वाढण्यात येणार असल्याची माहितीही प्रताप सरनाईकांनी दिलीय. स्वारगेट सारखी घटना पुढील भविष्यात होऊ नये, यासाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत. तसेच आगार आणि बसेसच्या सुरक्षेसाठी एआयचा वापर केला जाणार असल्याचंही मंत्री सरनाईक म्हणाले. तसेच एसटी बस आगाराची सुरक्षेच्या दृष्टीने ऑडीट केलं जाणार आहे.

ऑडिट केल्यानंतर बस आणि बस आगारातील त्रुटी लक्षात येतील. स्वारगेट अत्याचार प्रकरणी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, स्वारगेटच्या बस स्थानकात असलेल्या सीसीटीव्हीमुळे आरोपी दत्ता गाडे याचा शोध पोलिसांनी घेतलाय. त्यामुळे स्वारगेट बस स्थानकातील यंत्रणा चांगल्या प्रकारे कार्यान्वित होती हे सिद्ध होत असल्याचंही सरनाईक म्हणाले. पण दुसऱ्या कुठे सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसेल तेथे ही यंत्रणा लावलण्यात येईल अशी माहितीही त्यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com