Pune Crime Swargate St Depot: ताई, कुठे जाताय...;पीडितेसोबत आरोपी नेमका काय बोलला, काय झाला संवाद?

Pune Crime Rape On Girl At Swargate depot: पुण्याच्या स्वारगेट एसटी आगारात नेमकं काय घडलं? फलटणला जाणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग करण्यात आला.
Pune Crime
Pune Crime Rape On Girl At Swargate depotsaamtv
Published On

पुण्यातील स्वारगेट एसटी आगारात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये 26 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुणे हादरलंय. मात्र स्वारगेटसारख्या गजबजलेल्या एसटी आगारात ही घटना घडलीच कशी, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषदे घेत या प्रकरणाचा सविस्तर तपशील सांगितलाय.

सोमवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणी पुण्याहून फलटणला जाण्यासाठी स्वारगेट बस स्थानकावर आली होती. बसची वाट पाहत असताना एक इसम तिच्याकडे आला. तो तिच्याशी गप्पा करू लागला. काही वेळ गप्पा केल्यानंतर अनोळखी व्यक्ती तरुणीच्या बाजुला येऊन बसला. त्यानंतर काही वेळ तिच्याशी चर्चा केल्यानंतर तिला अंधारात असलेल्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेलं आणि तेथे तिच्यावर अत्याचार केला.

Pune Crime
Dattatray Gade : पुण्यात तरुणीवर अत्याचार, प्रकरण तापलं; शिरुरमधल्या दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांचे ८ पथक रवाना

याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची ओळख पटलीय. आरोपीचा शोध घेण्यासाठी आठ पथके रवाना झाली आहेत.अशात प्रश्न उपस्थित होतोय, अनोळखी व्यक्तीसोबत पीडितेची काय चर्चा झाली. याबाबत पोलिसांनी माहिती दिलीय, पीडिता पुण्यात कामाला होती आणि ती फलटणाला घरी जात होती. त्यामुळे ती स्वारगेट बस स्टेशनवर आली होती तेथे एका बाकावर बसली होती. त्यावेळी आरोपी तेथे फिरताना दिसत असल्याचं माहिती पोलिसांनी दिली.

Pune Crime
Pune News : केबिनला दोरी बांधलेली, एन्ट्रीच्या दरवाजाला लॉक नाही; पुण्यातील 'त्या' शिवशाही बसचं धक्कादायक वास्तव समोर

पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करताना तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक केले आहेत. त्यात आरोपी पीडितेसोबत बोलताना दिसतोय. काही वेळ बोलणं झाल्यानंतर नराधम तरुणीच्या शेजारी येऊ बसतो. त्यावेळी त्या तरुणीसोबत बसलेला एक व्यक्ती तेथून उठून जातो. नराधम तिच्याजवळ बसल्यानंतर तो तिची विचारपूस करतो. ताई तुम्हाला कुठे जायचंय, असा प्रश्न करत त्याने त्या तरुणीची माहिती काढली.

नराधम तरुणीशी गोड-गोड बोलून तिची सर्व माहिती काढून घेतली. कुठे जायचंय असं विचारल्यानंतर तरुणीने सांगितलं की, ती फलटण जातेय. त्यावर दत्तात्रय गाडे म्हणाला की, सातारची बस तिकडे लागलीय. त्यावर तरुणी म्हणाली, नाही सातारची बस इकडेच लागते, म्हणून मी इथे बसलेय. पण आरोपीने तरुणीला बस दुसरीकडे लागलीय. मी तुला तिकडे घेऊन जातो, असे सांगितलं. सीसीटीव्हीत ही तरुणी आरोपीच्या पाठीमागे चालत असल्याचं दिसतंय.

बसकडे गेल्यानंतर बसमध्ये तरुणीने पाहिलं की बसमध्ये अंधार आहे. तर आरोपीने सांगितलं की, ही रात्रीची बस आहे, लोकं झोपली आहेत, तू टॉर्च लावून बघून घे. असं म्हटल्यानंतर तरुणी बसमध्ये टॉर्च लावण्यासाठी वरती चढली. त्यावेळी त्या इसमाने बसचा दरवाजा लावून घेत तिच्यावर अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com