Dattatray Gade : पुण्यात तरुणीवर अत्याचार, प्रकरण तापलं; शिरुरमधल्या दत्तात्रय गाडेच्या शोधासाठी पोलिसांचे ८ पथक रवाना

Pune Swargate Bus Depo Crime News : आरोपीच्या मागावर पोलिसांचे ८ पथक रवाना झाले आहेत. आरोपीवर याआधी स्वारगेट पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे.
8 police teams leave to search for Dattatray Gade
8 police teams leave to search for Dattatray GadeSaamTV
Published On

पुणे : राज्यात सर्वत्र गुन्हेगारीचं प्रकरण वाढत चाललं आहे. याचदरम्यान, पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली. ही घटना बस स्थानकात पहाटे ५.३०च्या सुमारास घडली आहे. पीडितेवर अत्याचार झाल्यानंतर तरुणी त्या बसमधून उतरली अन् दुसऱ्या बसमध्ये चढली. तिथून ती आपल्या घरी म्हणजे फलटणला गेली.

घरी पोहोचल्यानंतर तिने कुटुंबियांना घडलेली सर्व घटना सांगितली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. अत्याचार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो देखील आता समोर आला आहे. आरोपीच्या मागावर पोलिसांचे ८ पथक रवाना झाले आहेत. आरोपीवर याआधी स्वारगेट पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे. दत्तात्रय याच्यावर ग्रामीण भागात जास्त गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे. आरोपीच्या भावाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीच्या राहत्या गावातून शिरुरमधून त्याच्या भावाला ताब्यात घेतलं आहे.

8 police teams leave to search for Dattatray Gade
Pune Crime : शिवशाहीत बलात्कार करणारा हाच तो दत्ता गाडे, फोटो आला समोर

दत्तात्रय गाडे कोण आहे?

या प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर या आधी गंभीर गुन्हे नोंद आहेत. चेन स्नॅचींग सारखे गुन्हे त्याच्यावर आहेत. पोलिसांकडून या नराधम आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. मात्र, या घटनेनं पुन्हा एकदा पुणे शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर रहदारी असते, अशातही आरोपीने या तरूणीवर एसटी बस स्थानकामध्ये असं कृत्य केल्यानं महिला सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

8 police teams leave to search for Dattatray Gade
Pune Crime: फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला नराधमाने जाळ्यात कसं ओढलं? धक्कादायक माहिती आली समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com