Pune Crime: फलटणला जाणाऱ्या २६ वर्षीय तरुणीला नराधमाने जाळ्यात कसं ओढलं? धक्कादायक माहिती आली समोर

Pune Girl Rape Case In Swargate: एका २६ वर्षीय तरुणीवर पहाटे स्वारगेट एसटी स्टँडमध्ये उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडलीय.
Pune Crime
Pune Girl Rape Case In Swargatesaam tv
Published On

स्वारगेट बस स्टॅण्डवर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. या अत्याचाराच्या घटनेने पुणे हादरलंय. नेहमी गजबज राहणाऱ्या स्वारगेट एसटी स्टँड परिसरात हा संतापजनक घटना घडलीय. याप्रकरणावरून पुन्हा एकदा राज्यातील कायदा सुव्यवस्था आणि महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या नराधमाने तरुणीला आपल्या जाळ्यात कसं ओढलं याबाबतची माहिती समोर आलीय.

कधी घडली घटना?

पहाटे साडेवाजताच्या सुमारास तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली. पुण्यातील अत्यंत गजबजलेल्या स्वारगेट बस स्थानकावर हा प्रकार घडला. बस स्थानकात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार केला. ही बस अंधाराच्या ठिकाणी उभी होती. नराधम या तरुणीला खोटं बोलून बसमध्ये घेऊन आला त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला.

नराधमाने तरुणीला जाळ्यात कसं ओढलं?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता पुण्यातून फलटणच्या दिशेने निघाली होती. स्वारगेट एसटी स्टँड परिसरात आल्यानंतर ती एका बाकड्यावर बसली होती. फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती. यावेळी एक अनोळखी इसम तिच्याकडे आला. तिला कुठे जात असल्याचं विचारलं. त्यावेळी तरुणीने आपण फलटणला जाणार असल्याचं सांगितंल. त्यावर त्या नराधमाने बस येथे थांबत नाही. फलटणला जाणारी बस ही दुसरीकडे थांबते असं सांगितलं.

पण तरुणीने माझी एसटी याच ठिकाणी थांबते, मी तिकडे जाणार नाही, असं त्या इसमाला सांगितलं. मात्र मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत त्या तरुणाने तिला त्याच्या शब्दात अडकवलं. नराधमाने तिला आपल्या खोट्या गोष्टीतून पटवून तिला अंधारात उभ्या असलेल्या बसजवळ नेलं. त्यानंतर एका शिवशाही बसमध्ये तिला जाण्यास सांगितलं.

मुलगी तेथे गेल्यानंतर तिने ही एसटी तर बंद आहे, असं सांगितलं. तू टॉर्च लावून आतमध्ये जा हीच एसटी काही वेळात फलटणला निघेल, असं या नराधमाने तिला सांगितले. तरुणी बसमध्ये चढताच तो नराधमही त्या बसमध्ये गेला. त्यानंतर त्याने बसचा दरवाजा बंद केला आणि तरुणीवर अत्याचाचर केला. मिळालेल्या माहितीनुसार,घटना होण्याआधीचा सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. तर दत्तात्रय गाडे असं त्या नराधमाचं नाव असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान सदर घडलेला संपूर्ण प्रकार या मुलीने पोलिसांना सांगितला. त्याआधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com