संदीप भोसले, लातूर प्रतिनिधी
Ambajogai–Latur National Highway Accident : अंबाजोगाई-लातूर राष्ट्रीय महामार्गावर बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमेवर सोमवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट डिझायर (Swift Dzire) आणि स्कार्पिओ (Scorpio) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत तीन जण जागीच ठार झाले असून, चार जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल केले. पोलिसांनी या अपघाताची नोंद केली असून पुढील तपास करण्यात येत आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, एम एच १२ सी वाय ७०२२ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर या कारमधून चार जण सायगाव येथे सुरू असलेल्या उरुसासाठी जात होते. भरधाव वेगात असलेल्या या कारवरील चालकाचा ताबा सुटला. यामुळे कार थेट रस्त्याच्या दुभाजकावरून उसळून विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम एच 24 वाय ४७७१ क्रमांकाच्या स्कार्पिओ गाडीवर जोरात आदळली.यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.
हा अपघात इतका भीषण होता की, स्विफ्ट डिझायरमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर, स्कार्पिओमधील दोन महिलांसह अन्य दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.
गंभीर जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी लातूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. जखमी आणि मृतांची ओळख पटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उरूसाला जाणाऱ्या प्रवाशांवर काळाने घाला घातल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघातातील मृतांची नावे आणि कोणत्या गावचे रहिवासी आहेत, हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस घटनेचा पंचनामा करत असून पुढील तपास सुरू आहे.
कोरेगाव भीमा येथे भीषण अपघात; एक महिला ठार, एक गंभीर जखमी
पुणे–अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा परिसरात सळईने भरलेल्या ट्रकला पहाटेच्या सुमारास पाठीमागून कारने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
निलम रामचंद्र दाभाडे (रा. मांजरी) असे मृत महिलेचे नाव आहे. संबंधित कार पुण्याच्या दिशेने जात असताना हा अपघात झाला. धडकेनंतर कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस व आपत्कालीन पथक घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.