Maharashtra Mahanagarpalika Elections : कार्यकर्त्यांनो लागा कामाला! २९ महापालिकांचा निवडणूक निकाल १६ जानेवारीला, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra Municipal Election schedule Announced: महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणेसह २९ महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला निकाल जाहीर केला जाणार आहे.
Mumbai Thane Pune Nashik mahanagarpalika elections date
Election Commission officials announce the schedule for Maharashtra’s 29 municipal corporation elections at a press conference.Saam TV marathi News
Published On

Mumbai Thane Pune Nashik mahanagarpalika elections date : मुंबई, ठाणे, पुण्यासह २९ महापालिकेची निवडणूक जाहीर झाली असून आतापासूनच राज्यात आचारसंहिता लागू झाली. १५ जानेवारी रोजी मतदान होईल, तर दुसऱ्या दिवशीच निकाल जाहीर होईल, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलेय. निवडणूक आयोगाकडून महापालिका निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे.

२९ महापालिकेमधील २८६९ जागांसाठी मतदान होणार आहे. महिला - १४४२, अनुसुचित जाती ३४१, अनुसुचित जमती ७७, नागरिकांचा मागस प्रवर्ग ७६९ इतक्या जागा असतील. महापालिका निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी वापरण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

२९ महापालिका निवडणुकीचं संपूर्ण वेळापत्रक-

उमेदवारी अर्ज दाखल कधी करता येणार? २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५

उमेदवारी अर्जाची छाननी कधी होणार? ३१ डिसेंबर ३०२५

उमेदवारी माघारी घेण्याची मुदत कधीपर्यंत?- २ जानेवारी २०२६

चिन्ह वाटप कधी? अंतिम उमेदवाराची यादी - ३ जानेवारी २०२६

२९ महापालिकेसाठी मतदान कधी होणार? - १५ जानेवारी २०२६

मतमोजणी, निकाल कधी जाहीर होणार? - १६ जानेवारी २०२६

Mumbai Thane Pune Nashik mahanagarpalika elections date
Pune to Nagpur : पुण्याहून नागपूरला फक्त ५ तासांत, नितीन गडकरींचा दावा, ७०० किमीचा मार्गही सांगितला

कोणत्या २९ महापालिकेसाठी लागली निवडणूक ?

अहिल्यानगर,अकोला,अमरावती,भिवंडी-निजामपूर ,बृहन्मुंबई,चंद्रपूर ,छत्रपती संभाजीनगर,धुळे ,इचलकरंजी,जळगाव, जालना ,कल्याण- डोंबिवली ,कोल्हापूर ,लातूर,मालेगाव,मीरा- भाईंदर ,नागपूर,नांदेड वाघाळा ,नाशिक ,नवी मुंबई, पनवेल,परभणी ,पिंपरी- चिंचवड ,पुणे ,सांगली- मिरज कुपवाड ,सोलापूर,ठाणे ,उल्हासनगर , वसई विरार

Mumbai Thane Pune Nashik mahanagarpalika elections date
Pune to Nagpur : पुण्याहून नागपूरला फक्त ५ तासांत, नितीन गडकरींचा दावा, ७०० किमीचा मार्गही सांगितला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com