Terrorist Attack : सिडनी दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन, बाप-लेकाने अंधाधुंद गोळ्या झाडल्या, १६ जणांचा मृत्यू

Sydney Terror Attack: ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडाई बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन समोर आले.
Bondi Beach Attack:
One of the armed attackers seen carrying a gun and ammunition during the Bondi Beach shooting in Sydney.saam tv
Published On

Pakistan connection in Sydney shooting case : ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील बोंडाई बीचवर २ दहशतवाद्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या दहशतवादी हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन उघड झाले आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांनी अन् गुप्तचर संस्थांनी केलेल्या तपासात हल्ला कऱणारे बाप-लेक असल्याचे उघड झाले आहे. दोघेही पाकिस्तानमधील लाहोरचे असल्याचे समजतेय. एका हल्लेखोराचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालाय. तर दुसरा हल्लोखोर गंभीर जखमी असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोराचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बिचवरील या गोळीबाराच्या घटनेत इंग्लंडचा माजी खेळाडू माइकल वॉन थोडक्यात बचावला.दरम्यान, ऑस्ट्रेलियाच्या इतिहासात हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला असल्याचे बोलले जातेय.

सिडनी शहरात ज्यूंच्या उत्सवादरम्यान बोंडाई बीचवर दोन बंदुकधाऱ्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. यामध्ये आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी आहेत. मृतकांमध्ये सर्व ऑस्ट्रेलियाचे नागरीक होते की इतर देशाचे नागरीकही होते? याबाबत अद्याप माहिती समोर आळेली नाही. गोळीबाराच्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ऑस्ट्रेलियातील दहशतवादी हल्ल्यानंतर जगात खळबळ उडाली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवरून या हल्ल्याचा निषेध नोंदवला. हा मानवतेवर हल्ला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. या हल्ल्याचे पाकिस्तान कनेक्शन समोर आलेय.

Bondi Beach Attack:
KDMC News : निशाणा बरोबर लागेल! महापालिका निवडणुकीआधीच वातावरण 'बिघडलं'; शिंदेंचा नेम नेमका कुणावर?

हल्लेखोर कोण आहेत?

ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून या दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू केलय. आंतरराष्ट्रीय कटाचा संशय उपस्थित केला जात आहे. स्थानिक मिडिया रिपोर्ट्सनुसार, नवीद अक्रम (२४) आणि त्याचे वडील साजिद अक्रम (५०) या दोघांनी हल्ला केला. हे दोघेही पाकिस्तानी नागरिक होते. नवीद अक्रम याने इस्लामाबादमधील एका विद्यापीठात शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथील अल-मुराद इन्स्टिट्यूटमध्येही शिक्षण घेतलेय.

Bondi Beach Attack:
Education Department : शिक्षण विभागाची मोठी कारवाई, मुंबईतील २ दिग्गज शाळांची मान्यता रद्द

दहशतवादी संघटनेशी संबंध?

नवीदचे कट्टरपंथी नेटवर्कशी काही संबंध होते का? याचा तपास ऑस्ट्रेलियातील सुरक्षा संस्था करत आहेत. हिजबुल्लाह, हमास आणि पाकिस्तानमधील लष्कर-ए-तोय्यबा यासारख्या कोणत्या दहशतवादी संघटनांशी संभाव्य संबंधांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, साजिद याचा जागीच मृत्यू झाला. नवीद अक्रम गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सिडनीच्या पश्चिम उपनगरातील बोनीरिग येथील त्यांच्या घरावर छापा टाकला आणि परिसर सील केला.

Bondi Beach Attack:
Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com