Mumbai schools recognition cancelled by education department : मोफत शिक्षण कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबईतील दोन शाळांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. श्रीमती मनरादेवी एज्युकेशन संस्था आझादवाडी, दामू नगर, कांदिवली पूर्व मुंबई आणि हनुमंत विद्यामंदिर शाळा कावरपाडा सातीवली पूर्व केंद्र वालीव तालुका वसई जिल्हा पालघर या इंग्रजी माध्यम आणि हिंदी माध्यम शाळांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली.
शिक्षकाने शिक्षा केल्यामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. त्या शाळेमध्ये शैक्षणिक दर्जा घसरल्याचे दिसून आले. शाळेची बांधकाम परवानगी ही शाळेकडे नाही. दोन्ही शाळांमध्ये इयत्ता नववी, इयत्ता दहावी या वर्गांची परवानगी नसतानाही अनाधिकृतपणे हे वर्ग चालवण्यात येत आहेत. सरकारच्या नियमानुसार या शाळेत सखी सावित्री समिती त्याचबरोबर माता पालक समिती स्थापन नाही. असे अनेक ठपके ठेवत या शाळांची मान्यता शिक्षण विभागाने रद्द केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.