KDMC News : निशाणा बरोबर लागेल! महापालिका निवडणुकीआधीच वातावरण 'बिघडलं'; शिंदेंचा नेम नेमका कुणावर?

Shrikant Shinde News : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीआधीच राजकीय वातावरण तापले आहे. शूटिंग रेंजच्या लोकार्पणावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सूचक टोला लगावत आगामी निवडणुकांबाबत आत्मविश्वास व्यक्त केला.
Shrikant Shinde News
Shrikant ShindeSaam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, कल्याण, साम टीव्ही प्रतिनिधी

Shrikant Shinde on Kalyan Dombivli election : आत्तापर्यंत निशाणे बरोबर लागले आहेत आणि येणार्‍या निवडणुकीतही निशाणा बरोबरच लागेल, असा सूचक आणि राजकीय टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांना लगावला. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या अत्याधुनिक शूटिंग रेंजच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. कल्याणच्या चिकणघर परिसरात उभारण्यात आलेल्या या शूटिंग रेंजचे लोकार्पण खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी त्यांनी स्वत: नेमबाजी करत शूटिंगचा आनंदही घेतला. नेमबाजीसारख्या खेळाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचे त्यांनी सांगीतले.

शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून साकारलेली ही शूटिंग रेंज ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी आणि पहिली अत्याधुनिक सुविधा असल्याचे मानले जात आहे. या केंद्रात १० मीटरचे दोन शूटिंग रेंज आणि २५ मीटरचे एक शूटिंग रेंज उपलब्ध असून, नवोदित तसेच व्यावसायिक नेमबाजांना याचा मोठा फायदा होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला स्थानिक पदाधिकारी, क्रीडाप्रेमी नागरिक आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shrikant Shinde News
Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली, आता काय कराल? लाडक्या बहि‍णींसाठी सरकारची मोठी घोषणा

यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच स्थानिक तरुणांना आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अशा सुविधा आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले. तसेच आपल्या शैलीत बोलताना त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आगामी निवडणुकींबाबत आत्मविश्वासही व्यक्त केला.

Shrikant Shinde News
Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com