Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली, आता काय कराल? लाडक्या बहि‍णींसाठी सरकारची मोठी घोषणा

One time e-KYC edit Ladki Bahin Yojana : ई-केवायसी करताना चूक झाली असल्यास लाडक्या बहिणींना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत एकदाच दुरुस्तीची संधी देण्यात आली आहे. आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana newsSaam tv
Published On

Maharashtra Ladki Bahin Scheme e-KYC latest update : राज्यातील अपात्र अन् बोगस लाडक्या बहि‍णींना वगळण्यासाठी राज्य सरकारकडून ई केवायसी करण्यात येत आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही डेडलाईन ठरवण्यात आली आहे. पण अनेक लाडक्या बहिणींकडून ईकेवायसी करताना चुका झाल्याचे समोर आले. त्यामुळे राज्य सरकारकडून लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरूस्त करण्याची संधी राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. ३१ डिसेंबर २०२५ आधी ई केवायसीमध्ये फक्त एकवेळा दुरूस्ती करता येईल, असे स्पष्ट करण्यात आलेय. दरम्यान, आतापर्यंत एक कोटींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी ईकेवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पण काही महिलांकडून ईकेवायसी करताना चुका झाल्या आहेत. त्या दुरूस्त करण्याची संधी सरकारकडून देण्यात आली आहे.

राज्यातील लाडक्या बहि‍णींसाठी महाराष्ट्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी एक्सवर पोस्ट करत लाडक्या बहिणींना ई-केवायसी दुरुस्तीची एक संधी मिळणार असल्याचं जाहीर केलंय. त्याशिवाय पती-वडील हयात नाहीत, अशा लाडक्या बहि‍णींना आता अधिकृत संकेतस्थळावरून ई-केवायसी करण्यात येणार असल्याचीही घोषणाही करण्यात आली आहे. राज्यातील महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रूपयांची आर्थिक मदत दिली जाते. प्रत्येक वर्षी लाडक्या बहि‍णींना ई-केवायसी करणे राज्य सरकारकडून अनिवार्य करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana
Marathi Prime Minister : १९ डिसेंबरला राजकीय भूकंप होणार, मराठी माणूस पंतप्रधान होणार, माजी मुख्यमंत्र्यांचे खळबळजनक वक्तव्य

आदिती तटकरेंनी नेमकं काय म्हटलेय?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बहुतांश लाभार्थी या दुर्गम, ग्रामीण भागातील आहेत. e-KYC प्रक्रिया करत असताना त्यांच्याकडून काही चूक होणे स्वाभाविक आहे. या चुका दुरुस्त करण्याची संधी मिळावी अशा आशयाची अनेक निवेदने विभागास प्राप्त झाली आहेत. योजना ही महिला सक्षमीकरणाच्या हेतूने राबविण्यात येत आहे, म्हणूनच या महिलांना e-KYC करताना झालेली चूक सुधारण्याची संधी देणे अत्यंत गरजेचे आहे. हीच बाब लक्षात घेऊन e-KYC मध्ये केवळ एकदाच सुधारणा करण्याची अंतिम संधी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत देण्यात येत आहे. या सोबतच पती किंवा वडील हयात नसलेल्या लाडक्या बहिणींना e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीही पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही प्रक्रिया अधिक सुलभ व सोपी असावी, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी महिला व बालविकास विभाग कटिबद्ध आहे.

Ladki Bahin Yojana
Municipal Elections : २९ महापालिका निवडणुका एकाच टप्प्यात, घोषणा कधी होणार? महत्त्वाची अपडेट
Ladki Bahin Yojana e-KYC correction option
Ladki Bahin Yojana e-KYC correction optionAditi Tatkare
Ladki Bahin Yojana
Eknath Shinde : एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? प्रकाश आंबेडकरांचं खळबळजनक भाकीत

लाडक्या बहि‍णींच्या खात्यात एकत्र ३ हजार?

डिसेंबरचा अर्धा महिना झाला आहे, पण अद्याप लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर नोव्हेंबर महिन्याचे १५०० रूपये जमा झालेले नाहीत. त्यातच राज्यात महापालिका निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते. सूत्रांच्या महितीनुसार, नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचे ३००० रूपये लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर एकत्र येऊ शकतात. महायुती सरकारला लाडक्या बहि‍णींचा विधानसभा निवडणुकीत फायदा झाला होता. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीच्या वेळीही लाडक्या बहि‍णींना खूश कऱण्यासाठी सरकारकडून एकाचवेळी ३ हजार रूपये खात्यात पाठवले जाऊ शकतात.

Ladki Bahin Yojana
Pune : पुण्याहून संभाजीनगरला फक्त २ तासात, नव्या महामार्गाची घोषणा, वाचा सरकारचा नेमका प्लान काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com