सायबर विभागातील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजीत कासले नंतर आता त्याच विभागातील पोलीस निरीक्षकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आलंय. सुनील नागरगोजे असे पोलीस निरीक्षकाचे नाव असून, पोलीस महासंचालक कार्यालयाने संबधित प्रकरणाची सुनावणी केल्यानंतर नागरगोजे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आलीय. तत्कालीन पोलीस अधीक्षक यांना शिवीगाळ करणे त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना धमकावणे या कारणामुळे बडतर्फ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुनील नागरगोजेंना बडतर्फ करण्यामागचं कारण
सुनील नागरगोजे यांनी बीडचे तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याशी उद्धटपणे वागून शिवीगाळ केली होती, तसेच कार्यालयीन कर्मचाऱ्याला धमकावल्याची गंभीर तक्रारही त्यांच्या विरोधात होती. या गैरवर्तणुकीचा अहवाल नंदकुमार ठाकूर यांनी वरिष्ठांकडे सादर केला होता. या प्रकरणात पोलीस महासंचालक कार्यालयाने सुनावणी घेतल्यानंतर सुनील नागरगोजे यांना सेवेतून बडतर्फ केले आहे.
एलसीबीसाठी होता नागरगोजे यांचा हट्ट
पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांना स्थानिक गुन्हे शाखेत पोस्टिंग हवी होती. यासाठी त्यांनी नेत्यांमार्फत दबावही टाकला. मात्र, पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि धमक्या दिल्या, असा आरोप आहे.
नागरगोजे यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली असून, त्यांच्यावर याआधीही शिस्तभंगासंदर्भात आरोप झाले होते. अखेर त्यांच्या एकूण वर्तणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यांना सेवेतूनच बडतर्फ केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.