Pune Crime: प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली

Pune Woman Rescued from Strumpet Racket: पुण्यातील बुधवार पेठेत प्रेमाचे आमिष दाखवून आसाम येथील एका महिलेला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीला पाच लाख रुपयांना विकून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Pune crime
Pune crimeSaam Tv
Published On

पुण्यातील बुधवार पेठेत प्रेमाचे आमिष दाखवून आसाम येथील एका महिलेला आणि तिच्या सहा वर्षांच्या मुलीला पाच लाख रुपयांना विकून वेश्याव्यवसायात ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात फरासखाना पोलीस ठाण्यातील डीबी विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

नेमकं घडलं काय?

शफिउल आलम याने मरझिना सद्दाम हुसेन खातून हिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून आसामहून पुण्यात आणली. मरझिना हिचं आधीच लग्न झालं होतं. तिला सहा वर्षांचा मुलगा असल्याची माहिती आहे. पतीकडून होणाऱ्या मारहाणीला कंटाळून ती शफिउलच्या प्रेमात पडली. तसेच त्याच्या प्रेमाखातर ती पुण्यात आली. मात्र, पुण्यात आल्यानंतर शफिउलने तिला बुधवार पेठेत ढकलले.

Pune crime
Pahalgam Video: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा VIDEO

बुधवार पेठेतून पळून आल्यावर मरझिना दगडूशेठ गणपतीजवळ काही गोरक्षकांना सापडली. पीडित महिलेनं त्यांना आपबिती सांगितल्यावर गोरक्षकांनी तिला भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात नेले. मात्र, नंतर तिला फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे तक्रार दाखल करण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यावेळी एका पोलील कर्मचाऱ्याने तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे गोरक्षकांनी ठाण्याबाहेर आंदोलन केले. त्यानंतरच पोलिसांनी अखेर गुन्हा दाखल केला.

Pune crime
Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये कपलचे शरीरसंबंध; Video व्हायरल झाल्यानंतर गुन्हा, तरूण-तरुणीला काय शिक्षा होऊ शकते?

मरझिनाने पोलिसांना सांगितले की, फरासखाना पोलीस ठाण्यातील डीबी विभागातील कर्मचारी तिच्यावर मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार करत होता. तसेच बुधवार पेठेत तिच्यासारख्या अनेक पीडित महिला आहेत, याची माहिती तिने पोलिसांना दिली होती. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात येते. या प्रकरणाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com