Beed Shocking:'मी फक्त तुझ्यासाठी घरी येतो, माझ्या मांडीवर बस'; बीडच्या पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्याचं मुलीसोबत अश्लील कृत्य

Police Staff Booked Under POCSO for Assaulting 14-Year-Old Girl: पोलीस स्टेशनमधील एका चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे.
beed News
beed NewsSaam
Published On

बीड जिल्ह्यातील नेकनूर गावात एक संतापजनक घटना घडली आहे. पोलीस स्टेशनमधील एका चतुर्थ श्रेणी वर्गातील कर्मचाऱ्याने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याच्याविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी गेल्या ७ दिवसांपासून फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे.

नेमका घडलं काय?

पवन निर्मळकर असे आरोपीचे नाव आहे. आरोपी गेल्या काही दिवसांपासून एका मुलीवर लक्ष ठेवून होता. त्या अल्पवयीन मुलीच्या घरी आरोपी गेला, आणि तिला मांडीवर बसण्याचा आग्रह केला. तसेच 'मी तुमच्या घरी फक्त तुझ्यासाठी येतो' असं आरोपीने अल्पवयीन मुलीला सांगितलं.

beed News
Pahalgam Attack: 'आम्ही भारतासोबत' डोनाल्ड ट्रम्पकडून PM मोदी अन् भारतीयांना फुल्ल सपोर्ट

यानंतर पीडितेने याची माहिती आई वडिलांनी दिली. संतप्त पीडित मुलीच्या आई वडिलांनी १८ एप्रिल रोजी नेकनूर पोलीस ठाण्यात धाव घेत नराधम आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत आरोपीविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून, त्याच्या शोधासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

beed News
Buldhana: धक्कादायक! २५ वर्षीय तरूणाने एकाचवेळी २०० ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या; जागीच मृत्यू

अन्य गंभीर बाबी

- पवन निर्मळवर गुंड वाल्मीक कराडचा हस्तक असल्याचा संशय असून, या प्रकरणात आधीच चर्चेत असलेल्या पोलीस कर्मचारी बालासाहेब ढाकणे व सुखदेव बांगरसोबत त्याने सोशल मीडियावर रील्स केल्याचे आढळून आले आहे.

- पवन निर्मळ पोलीस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची विविध कामे करत असल्याचेही उघड झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com