Pahalgam Attack: 'आम्ही भारतासोबत' डोनाल्ड ट्रम्पकडून PM मोदी अन् भारतीयांना फुल्ल सपोर्ट

US President has condemned the Pahalgam terror attack and offered support to India: काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेकडून भारताला ठाम पाठिंबा. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “भारतासोबत खंबीरपणे उभे आहोत”.
Trump And Pm Modi
Trump And Pm ModiNews 18
Published On

भारताचे नंदनवन असलेल्या काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन घाटात भ्याड दहशतवादी हल्ला झाला. या दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. अशातच अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ठाम पाठिंबा दर्शवला आहे.

पाकिस्तानस्थित लष्कर ए तोयब या संबंधित गटानं काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला होता. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय जनतेला तसेच पंतप्रधान मोदी यांना पाठिंबा दर्शवला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशलवर पोस्ट करीत म्हटलं की, 'काश्मीरमधून आलेली बातमी अतिशय वेदनादायक आहे. दहशतवादाविरूद्ध अमेरिका भारतासोबत उभा आहे. मृतांच्या आत्म्यास शांती लाभो, तसेच जखमी लवकरात लवकर बरे होवोत. हीच प्रार्थना', असं राष्ट्रध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Trump And Pm Modi
Buldhana: धक्कादायक! २५ वर्षीय तरूणाने एकाचवेळी २०० ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या; जागीच मृत्यू

तसेच त्यांनी पोस्टमध्ये, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील जनतेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या संवेदना तुमच्यासोबत आहेत', असं ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमधून पाठिंबा दर्शवला असल्याचं जाहीर केलं.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांपैकी एक, लेविट यांनी सांगितले की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प लवकरच पंतप्रधान मोदींशी संवाद साधतील आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करतील.

Trump And Pm Modi
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत आधीच माहिती होती; पोलिसांना फोन करणारा 'तो' कोण?

याशिवाय, ट्रम्प प्रशासनाच्या कालखंडातही अमेरिका भारताच्या दहशतवादाविरोधातील लढ्याची कट्टर समर्थक राहिली आहे. याच संदर्भात, २००८ च्या मुंबई हल्ल्याच्या आरोपी तहव्वुर राणा या पाकिस्तानी वंशाच्या कॅनेडियन नागरिकाचे अलीकडेच अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात आले. हे हल्ले देखील लष्कर-ए-तोयबानेच घडवून आणले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com