Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत आधीच माहिती होती; पोलिसांना फोन करणारा 'तो' कोण?

A drunk caller claimed about pahalgam attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २७ पर्यटकांचा बळी गेला आहे. या हल्ल्यानंतर दिल्ली पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीचा कॉल आला होता.
pahalgam
pahalgamSaam
Published On

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण जगाला हादरा बसला. या हल्ल्यात एकूण २७ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याच दरम्यान दिल्लीत आलेल्या एका फॉन कॉलमुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. दिल्ली पोलिसांना एक कॉल आला होता. या कॉलमध्ये एका अज्ञात व्यक्तीने पहलगामधील दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी माहिती दिली. त्यानंतर या कॉलचे गांभीर्य लक्षात घेत त्या व्यक्तीचा शोध घेण्यास सुरूवात झाली. मात्र, या प्रकरणात वेगळीच माहिती समोर आली.

दारूच्या नशेत होता व्यक्ती

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना एक अज्ञात व्यक्तीकडून कॉल आला होता. या फोनवर त्या व्यक्तीने एक खळबळजनक दावा केला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत आधीपासून कल्पना होती, अशी माहिती त्यानं दिली. हा फोन येताच पोलीस विभाग तातडीने सक्रिय झाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत दिल्ली पोलिसांनी यासंदर्भात एजन्सीला माहिती दिली. तसेच चौकशी केली. दरम्यान, चौकशी केल्यानंतर एक वेगळीच माहिती समोर आली.

pahalgam
Kolhapur: झोपाळा झाला मृत्यूचा फास! झोका घेताना फास लागला, श्वास गुदमरला; क्षणात चिमुकल्याचा मृत्यू

कॉल करणारा व्यक्ती दारूच्या नशेत होता. तसेच त्याने केलेला दावा पूर्णपणे निराधार असल्याचं तपासात आढळून आलं. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, तापासादरम्यान, हे स्पष्ट झालंय की, त्या व्यक्तीकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती. तो व्यक्ती दारूच्या नशेत होता. त्याने केलेला दावा पूर्णपणे निराधार होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

pahalgam
Mumbai News: मुंबईकरांनो लक्ष द्या! 'एल्फिन्स्टन पूल' कायमचा बंद; पर्यायी मार्ग कोणते? वाचा सविस्तर

कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव सुबोध त्यागी असे आहे. तो दिल्ली येथील रहिवासी असून, व्यवसायाने टेम्पो ट्रॅव्हलर ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. त्याने २३ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांना दारू पिऊन कॉल केला होता. तसेच त्यानं पहलगाम हल्ल्याबाबत केलेलं वक्तव्य पूर्णपणे खोटं होतं. आता या प्रकरणी त्याच्यावर कारवाई केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com