ब्रेकअप करताच एक्स गर्लफ्रेंडचे प्रायव्हेट VIDEO व्हायरल, पैशांची मागणी अन् ब्लॅकमेलिंग; शेवटी तरूणीनं..| Crime News

Ahmedabad breakup video leak Shocking Latest News: एका विकृत तरुणाने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची संतापजनक घटना उघड झाली आहे.
Crime News
Crime News Latest NewsSAAM TV
Published On

एका विकृत तरूणाने ब्रेकअपनंतर आपल्या एक्स गर्लफ्रेंडचे काही नग्न अवस्थेतील व्हिडिओ शूट करून व्हायरल केले आहेत. ही धक्कादायक घटना अहमदाबाद येथील बोडकदेव परिसरात घडली आहे. ही माहिती मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पीडित महिलेने आपल्या एक्स बॉयफ्रेंडविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी गेल्या २ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. २ महिन्यांपूर्वी त्यांनी ब्रेकअप केलं. नंतर आरोपीने तरूणीकडे काही पैसे मागितले. तरूणीनं नकार देताच आरोपी धमकी देऊ लागला. तसेच आरोपीने तरूणीला तिचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली.

Crime News
Pune Crime: प्रेमाच्या जाळ्यात विवाहित महिलेला अडकवलं, नंतर वेश्याव्यवसायात ढकललं; पोलीस कर्मचाऱ्यानेही अब्रु लुटली

इतकंच नाहीतर त्याने व्हिडिओ देखील व्हायरल केले. पीडित तरूणीला सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून मिळाली. त्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. एक्स बॉयफ्रेंडकडून झालेला छळ आणि त्याने व्हायरल केलेले व्हिडिओ ही सगळी माहिती तरूणीने पोलिसांनी दिली.

Crime News
शिंदे गटाच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, पुत्रालाही संपवणार असल्याचा मेसेज; राजकीय वर्तुळात खळबळ | Shinde Faction

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि संबंधित लैंगिक छळाविरोधी कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. संबंधित व्हिडिओ हटवण्याचीही प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com