शिंदे गटाच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी, पुत्रालाही संपवणार असल्याचा मेसेज; राजकीय वर्तुळात खळबळ | Shinde Faction

Shiv Sena MLA Arjun Khotkar and Son Receive Death Threats on Instagram: शिवसेना शिंदे गटातील आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यु खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
Shivsena
ShivsenaSaam
Published On

राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटातील जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी अभिमन्यू खोतकर यांनी जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू असून, या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चार इन्स्टाग्रामवरून धमक्या

मिळालेल्या माहितीनुसार, चार वेगवेगळ्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून अश्लील शिवीगाळ करत आमदार अर्जुन खोतकर आणि त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना गोळ्या झाडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकारामुळे जालना शहरात मोठी खळबळ उडाली.

Shivsena
Buldhana: धक्कादायक! २५ वर्षीय तरूणाने एकाचवेळी २०० ब्लड प्रेशरच्या गोळ्या खाल्ल्या; जागीच मृत्यू

पोलीस तपास वेगाने सुरू

खोतकर पिता पुत्राला धमकीचा मेसेज आल्यानंतर अभिमन्यू खोतकर यांनी यासंदर्भात जालना तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तसेच पोलिसांनी तातडीने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तपासाला सुरूवात केली असून, संबंधित इन्स्टाग्राम अकाउंटची सखोल चौकशी सुरू आहे.

Shivsena
Pahalgam Attack: पहलगाम हल्ल्याबाबत आधीच माहिती होती; पोलिसांना फोन करणारा 'तो' कोण?

दहशतवादी हल्ल्यावर अर्जुन खोतकरांची प्रतिक्रिया

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर अर्जुन खोतकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. 'जम्मू काश्मीर भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध! दहशतवादी हल्ल्यात निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. या दुर्देवी घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण करतो', असं खोतकर म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com