Sudhir Mungantiwar  Saam tv
महाराष्ट्र

Sudhir Mungantiwar: शिवरायांची वाघनखं आणण्यास विलंब का होतोय?, सुधीर मुनगंटीवारांनी सांगितलं कारण

Sudhir Mungantiwar On Shivaji Maharaj Waghnakh: सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या वाघनखा आणण्यास विलंब का होतोय यामागचे कारण सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे असलेली आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.

Priya More

संजय तुमराम, चंद्रपूर

छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj) यांची वाघनखं ब्रिटनकडून ४ मे रोजी महाराष्ट्रात आणण्यात येणार होते. पण या वाघनखा आणण्यास विलंब होत आहे. अशामध्ये १० जूनपर्यंत या वानखा महाराष्ट्रात आणण्यात येणार असल्याची शक्यता राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केली. साम टीव्हीशी संवाद साधताना सुधीर मुनगंटीवार यांनी शिवरायांच्या वाघनखा आणण्यास विलंब का होतोय यामागचे कारण सांगितले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे असलेली आचारसंहिता संपताच पुढील प्रक्रिया होईल, असे त्यांनी सांगितले.

सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, 'वाघनखं येण्याबाबत आम्ही ४ मे तारीख निश्चित केली होती. त्यादृष्टीने सर्व पत्रव्यवहार झाला. ४ मेला येण्याबाबत मंजुरी लिखित देण्यात आली. पण जेव्हा आचारसंहिता लागली तेव्हा त्यांनी आमच्याशी चर्चा केली. आचारसंहितामध्ये आणण्यामध्ये आमच्याही अडचणी होत्या. आक्षेप आला असता. निवडणूक आयोगाकडे काँग्रेस किंवा इतर पक्षांनी तक्रारी केल्या असत्या. निवडणूका बघून छत्रपती शिवाजी महाराजांबाबत भावनिक मतदारांना आव्हान केले जात आहे असा आरोप केला गेला असता. पण छत्रपती छत्रपती आहेत. शिवबा हृदयात पाहिजे.'

सुधीर मुनगंटीवार यांनी पुढे सांगितले की, 'आम्ही त्यांच्या आचारसंहितेच्या नंतर देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. १० जून तारीख आम्ही निश्चित केली आहे. पण त्यांनी आम्हाला सांगितले की १० जूनला आणायचे असेल तर तुमच्या निवडणूक आयोगाकडून पत्र पाहिजे की आचारसंहिता १० जून आधी संपेल. यासंदर्भात काल मी निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी आम्हाला १० जूनबाबत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले. त्यानंतर ते केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तो प्रस्ताव पाठवतील. त्यानंतर तिथून मंजुरी अपेक्षित आहे.'

तसंच, 'केंद्रीय निवडणूक आयुक्तांनी मंजुरी लेखी स्वरुपात दिली. त्यांचे पत्र आम्हाला ब्रिटनच्या म्युझियमसाठी पाहिजे. ज्यामध्ये त्यांनी ४ जूनला आमची आचारसंहिता संपेल असे लिहून दिलेले असेल. तर त्यानुसार आम्हाला १० जून तारीख आताच निश्चित करता येईल.' असे त्यांनी सांगितले. त्याचसोबत वाघनखं आणल्यानंतर कुठे ठेवली जाणार याबाबत त्यांनी सांगितले की, 'वाघनखं ठेवण्यासाठी जी सुरक्षा पाहिजे त्या व्यवस्था आम्ही पूर्ण केल्या आहेत. सातारा, नागपूर असं ठरलेले असलेल्या ठिकाणांची व्यवस्था आम्ही केली. पैसे मंजूर करून टेंडरही पूर्ण झाले आहे. सुरक्षेसाठी कोणतेही अडचण नाही.'

'कारण नसताना आचारसंहितेमध्ये वाघनखांबद्दल अडचण येऊ नये असे आम्हाला वाटते. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ४ मेला वाघनखा आणणे योग्य नाही. त्यामुळे १० जूनपर्यंत वाघनखा येतील. वाघनखांसाठी काही जागा निश्चित केल्या आहेत. साताऱ्यापासून आम्ही सुरूवात करणार आहोत. साताऱ्यानंतर नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणच्या म्युझियममध्ये वाघनखा ठेवल्या जातील.', अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT