Raj Thackeray And Shrikant Shinde
Raj Thackeray And Shrikant ShindeSaam Tv

Kalyan, Thane Lok Sabha: उमेदवारी जाहीर होताच श्रीकांत शिंदे- नरेश म्हस्के शिवतीर्थवर, राज ठाकरेंचा घेतला आशीर्वाद

Raj Thackeray And Shrikant Shinde: राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली.

महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत एकनाथ शिंदे (Shrikant Eknath Shinde) आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दोघांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी दोघांनी देखील राज ठाकरे यांना सभा घेण्याची मागणी केली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीनंतर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी भेट दिली.

राज ठाकरे यांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, 'आज आमची उमेदवारी फायनल झाली. राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. त्यांनी देखील आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले आहेत. येणाऱ्या काळात त्यांची सभा ठाणे आणि कल्याण लोकसभेसाठी होणार आहे. त्यांचे प्रेम आणि सहकार्य कायम आहे. राज ठाकरेंचा पक्ष ठरवेल कुठे आणि किती सभा घ्यायाच्या. त्यांच्या सभा प्रचाराला दिशा देण्याचे काम करतात. त्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्वात जास्त तरूण पीढी पुढे येते. त्यांची सभा ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत.'

Raj Thackeray And Shrikant Shinde
Sanjay Nirupam : संजय निरुपम यांची २० वर्षांनंतर घरवापसी; दोन दिवसात करणार शिवसेनेत प्रवेश

श्रीकांत शिंदे यांनी पुढे सांगितले की, 'राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. कुठलीही अपेक्षा न करता. मोठ्या मनाने ते महायुतीसोबत जोडले गेले आहेत. त्यांनी महायुतीला पूर्ण पाठिंबा दिला आहे. पूर्ण ताकदीने मनसेचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. राज ठाकरे यांच्या प्रचारामुळे महायुतीच्या उमेदवारांना मोठी ताकद मिळेल.', असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Raj Thackeray And Shrikant Shinde
Lok Sabha Election : मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघातील सर्व पक्षांचे उमेदवार ठरले; प्राध्यापक, वकील, आमदारही मैदानात

तसंच, 'महायुतीतीत शिवसेना १५ जागांवर निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्राताच्या हितासाठी महायुती निर्माण झाली आहे. नंबरने काही फरक पडत नाही. जास्तीत जास्त जागा कशा निवडणुन येतील यासाठी महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील. महाराष्ट्रातील सर्व जागा कशा जिंकता येतील यासाठी सर्व नेते कामाला लागले आहेत.', असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

Raj Thackeray And Shrikant Shinde
Sharad Pawar Speech : चांगलं काम करूनही केजरीवाल आज तुरुंगात; देशातील सद्यस्थितीवरून शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com