Sharad Pawar Speech : चांगलं काम करूनही केजरीवाल आज तुरुंगात; देशातील सद्यस्थितीवरून शरद पवारांचे नरेंद्र मोदींवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट केला. मात्र एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे, त्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली.
Sharad Pawar Speech
Sharad Pawar SpeechSaam Digital

विजय पाटील

नरेंद्र मोदी सत्तेवर 2014 मध्ये सत्तेत आले तेव्हा पट्रोल-डीझेलचे दर कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पार गेले आहेत. सिलिंडरच्या किंमतीही वाढल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचा कायापालट केला. मात्र एक चांगलं काम करणारा मुख्यमंत्री आज तुरुंगात आहे, त्यामुळे देशाची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे, अशी घणाघाती टीका शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर केली.

400 खासदार निवडणूक द्या, करण मोदी सरकारला घटनेत दुरुस्ती करायची आहे. घटना बदलायची आहे असं मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील एक खासदार म्हंणतात, 400 पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार अशी वेगळी विधाने करतात. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात. त्यामुळे सर्वांनी मविआला मदत करण्याची गरज, मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत, अंस आवाहन त्यांनी केलं.

Sharad Pawar Speech
Maharashtra Politics: आमचं सरकार आलं तर शेती अवजारांवर कोणताही टॅक्स आणि जीएसटी द्यावा लागणार नाही: जयंत पाटील

आज मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने सरकार चालवत आहेत, ते पाहिल्यावर चिंता वाटते. त्यामुळे ही निवडणूक देश कोणत्या पद्धतीने चालवायचा हे ठरवणारी निवडणूक आहे. लोकांची सहमतीने आणि लोकशाही मार्गाने देश चालवण्याची गरज असताना, हुकुमशाहीकडे देशाची वाटचाल सुरू असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Sharad Pawar Speech
Maharashtra Election: दिंडोरी लोकसभेत भाजपच्या माजी खासदाराची बंडखोरी; भारती पवारांची डोकेदुखी वाढणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com