Traffic Jam In Pune: सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली, वाहनांच्या संख्येत वाढ; पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी

Traffic Jam On Pune Mumbai Highway: पुणे मुंबई महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे.
 वाहतूक कोंडी
Traffic Jam In PuneYandex
Published On

दिलीप कांबळे, साम टिव्ही मावळ

पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर (Pune Mumbai Highway) वाहनांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. 1 मे सुट्टी निमित्ताने पर्यटक घराबाहेर पडले आहे. त्यामुळे मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या लेनवर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रयत्न केले जात आहेत. अवजड वाहने आणि हलकी वाहनांची संख्या वाढल्याने बोरघाटात वाहतूक संथ सुरू आहे.

पुणे-बेंगळुरू महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलं होतं. कराडजवळ वाहनांना तासभर खोळंबा झाला (Traffic Jam On Pune Mumbai Highway) होता. कराडजवळ जवळपास तासभर वाहनांची रखडपट्टी झाल्याचं दिसलं. सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. पुणे मुंबई महामार्गावर देखील वाहतूक संथ गतीने सुरू (Traffic Jam Update) आहे.

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर देखील वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलं होतं. इंदापूरजवळ झालेल्या अपघातामुळे वाहतुकीची मोठी (Traffic Jam News) कोंडी झाल्याचं समोर आलं आहे. ट्रकने कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. सुट्ट्यांमुळे वर्दळ वाढली आहे. वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

 वाहतूक कोंडी
Pune Traffic Jam: अवकाळी पावसाने पुणे शहराला झोडपलं, पुणे-नगर महामार्गावर होर्डिंग कोसळल्याने प्रचंड वाहतूक कोंडी

कोकणात येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्याच्या दोन्ही बाजूला चार ते (Traffic Jam) पाच किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. लग्नसराई तसंच सुट्टीमुळे प्रवाशांच्या आणि वाहनांच्या संख्येत वाढ झाली आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे. ते रस्त्यातच अडकून पडले आहेत.

 वाहतूक कोंडी
Pune Traffic diversion for PM Modi rally : PM मोदींची आज पुण्यात सभा, शहरातील अनेक रस्ते राहणार बंद; वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग कोणते?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com