Stray dogs attack  Saam Tv News
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट, कुत्र्यांचे चिमुकल्यांवर बिबट्यांसारखे हल्ले, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कधी?

Barking of Stray Dogs : सदाशिव नगरमध्ये सायकल चालविणाऱ्या एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालक वर्गात संतापाची लाट उसळलीये.

Prashant Patil

राज्यभर भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातलाय. कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे चिमुकल्यांचे बळीही गेलेत. मात्र आतापर्यंत राज्यात भटक्या कुत्र्यांनी किती जणांचा बळी घेतलाय? आणि भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा केला जाणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

इमानदार,राखणदार म्हणून त्याला बिरुदावल्या दिल्या जातात. कोणाचा मोती,कोणाचा राजा तर रोज दारात येऊन बसतो म्हणून या न त्या नावानं भटक्या कुत्र्यांवर प्रेम करणारे असंख्य आहेत. मात्र हिच भटकी कुत्री आता लोकांच्या जीवावर उठलीयेत..यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरात भटक्या कुत्र्यांच्या दहशतीचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीतून समोर आला आहे. सदाशिव नगरमध्ये सायकल चालविणाऱ्या एका चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यानं हल्ला केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पालक वर्गात संतापाची लाट उसळलीये. प्रशासनावर तीव्र रोष व्यक्त केला जातोय. यवतमाळमधील घटनाच नाही तर याआधीही अशाच घटनांमध्ये चिमुकले कुत्र्यांचं लक्ष्य ठरलेत.

कुठे कुठे कुत्र्यांचा हैदोस पहायला मिळाला?

अमरावती जिल्ह्यात तब्बल बाराशे पेक्षा अधिक नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा चावा

नंदुरबारमध्ये भटक्या कुत्र्यांचा हल्यात 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी तुळजापूर WIPE

तुळजापूरात 13 जनावरे 3 व्यक्तींवर कुत्र्याचा जीवघेणा हल्ला

कल्याणात भटक्या कुत्र्यांमुळे नागरीक भयभीत,पादचाऱ्यांना चावा

पारोळा शहरात मोकाट कुत्र्यांचा 15 जणांना चावा

मुरबाडच्या धसईत पिसाळलेल्या कुत्र्याचा 6 वर्षीय चिमुकलीवर हल्ला

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात चिमुरडा ठार

एवढंच नाही तर गेल्या 4 वर्षातील प्रमुख शहरातील पालिकेकडून प्राप्त झालेली आकडेवारीही धक्कादायक आहे. जानेवारी 2019 ते 30 ऑक्टोबर 2023 कालावधीत 25 लाख व्यक्तींवर कुत्र्यांचे हल्ले, 100 जणांचा मृत्यू झालाय. 2024 च्या महानगरपालिका आकडेवारीनुसार 18 हजार पुणेकरांना कुत्र्याचा चावा तरठाण्यात 13 हजार नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. गेल्या 3 वर्षात 2 लाख 14 हजार 950 मुंबईकरांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

भटक्या कुत्र्यांकडून होणारे हल्ले काही नवे नाहीत मात्र आता त्यात सातत्यानं वाढ होत असल्यानं प्रशासनानं याची गंभीर दखल घेऊन भटक्या कुत्र्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केलीये. मात्र उघड्यावर कचरा न टाकता आपला परिसर स्वच्छ कसा राहील याची थोडी जबाबदारी नागरिकांनीही घेणं गरजेचं आहे. यासह पालिकांनी वेळच्यावेळी कचरा उचलल्यास भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी होण्यास मदत होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shani Shingnapur : अभिषेक आता फक्त १०० रूपयांत येणार; शनिशंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाचा निर्णय, VIDEO

IPS अंजना कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या सरकारी अधिकाऱ्याला मारहाण; माढ्यातील कुर्डू गावात गुंडगिरी| Video

ST Reservation: आरक्षणासाठी बंजारा समाज आक्रमक, आता बंजारा समाजाला हवे, STमधून आरक्षण

Lalbaugcha Raja : लालबागचा राजा मंडळाच्या कार्यकर्त्यांना माज; कुणी केली मुख्यमंत्र्यांकडे तक्रार? VIDEO

Lingayat Community: 'लिंगायत जात नाही तर धर्म' धर्मावरुन नव्या वादाची ठिणगी

SCROLL FOR NEXT