Maharashtra Politics : एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये का जाणार होते? शिवसेना खासदाराने सांगितलं कारण

Eknath Shinde : एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये जाणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.. मात्र शिंदे हे बंड कधी करणार होते? शिंदेंचा काँग्रेस प्रवेश का रखडला? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Eknath Shinde
Eknath ShindeANI
Published On

भरत मोहळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

नाना पटोलेंनी शिंदे यांना मुख्यंमंत्रिपदाची ऑफर दिल्यानंतर राजकीय खळबळ उडाली असतानाच एकनाथ शिंदे यापूर्वीच काँग्रेसमध्ये जाणार होते, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केलाय.

राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यंमंत्री असताना एकनाथ शिंदेनी काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतल्याच्या या दाव्यानं महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्या समिकरणांच्या चर्चेला बळ दिलंय. शिंदेंचा हा प्रयत्न ते शिवसेनेत नेतेपदीही नसताना मात्र ठाणे जिल्हयाचे ठाणेदार असलेले एकनाथ शिंदे यांनी खरचं असा प्रयत्न केला होता का?

एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये का जाणार होते?

- उध्दव ठाकरे शिंदेना ठाण्याचा पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत होते .

- शिंदेंच्या वाढत चाललेल्या महत्वाकांक्षा आणि उध्दव ठाकरे यांच्या बरोबर दुरावलेले संबंध्द

- ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व ठेवण्यासाठी काँग्रेसची शिंदेंना गळ

- सत्तेत बरोबर राहण्याची शिंदेची भुमिका.

Eknath Shinde
Maharashtra Politics : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही फक्त एक व्यवस्था; भाजप नेते प्रवीण दरेकर असे का म्हणाले?

या प्रकरणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी प्रतिक्रीया देणं टाळलंय... मात्र शिवसेनेतून शिंदे बंडाचं निशाण फडकवलं मग हे बंड का फसलं? याचा लेखाजोखाच ठाकरे गटाच्या राजन विचारेंनी मांडलाय. दरम्यान शिंदेनी भगव्याचा नारा देत राजकीय चर्चाना वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केलाय.

Eknath Shinde
Pandharpur News : धुलीवंदनाच्या दिवशीच पंढरपुरात आढळलं २०८ किलो गोमांस, विठ्ठलाच्या पंढरीत चाललंय तरी काय?

महाविकास आघाडीचं सरकार असताना काँग्रेसचं वावडं असलेल्या शिंदेंना आता काँग्रेस चालणार का? याबरोबरच शिंदेंनी चर्चेसाठी काँग्रेससोबतचं दार खुलं ठेवलंय का? असे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मात्र राऊतांनीही पुन्हा 2013 मधील इतिहास उगळून एकनाथ शिंदेंचा हिंदुत्वाचा अजेंडा पोकळ असल्याचं दाखवून देण्याचा प्रयत्न केलाय का? असे अनेक प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतायत. हे मात्र निश्चित की राजकारण काहीच अशक्य नसतं.

Eknath Shinde
Aurangzeb Status : १४ जणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं, सोलापुरात तणाव; पोलीस अॅक्शन मोडवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com